situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : अफिम व दोडा चुरा विक्रीसाठी साठवणूक करणारा इसम जेरबंद

Published On:

अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी कारवाई

Team MyPuneCity – येवलेवाडी परिसरात अफिम आणि दोडा चुरासारख्या अंमली पदार्थांची साठवणूक करून त्याचा गैरव्यवहार करणाऱ्या एका इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी रंगेहाथ पकडले. आरोपीच्या ताब्यातून सुमारे पाच लाख रुपयांचा अफिम आणि दोडा चुरा असा अंमली पदार्थ जप्त (Pune Crime News) करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन सुखराम काला (वय ३१ वर्षे, रा. शिक्षक नगर, गल्ली नं. ०२, फ्लॅट नं. २०३, कामठे पाटील नगर, येवलेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे (Pune Crime News) नाव आहे.

Alandi Crime News : तलवारीने केक कापणे पडले महागात; सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

२७ मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना यश कॉम्प्लेक्स समोर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमावर त्यांचे लक्ष गेले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २५६ ग्रॅम ५८ मिलीग्रॅम अफिम (मूल्य ५,१३,१६० रुपये) आणि १ किलो ७२८ ग्रॅम अफीमची बोंडे (दोडा चुरा व पॉपी स्ट्रॉ पावडर – मूल्य २५,९२० रुपये) असा एकूण ५,३९,०८० रुपयांचा अंमली पदार्थ सापडला. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

अर्जुन काला याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे तसेच अंमलदार संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड आणि स्वप्नील मिसाळ यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे येवलेवाडी परिसरात (Pune Crime News) अंमली पदार्थांच्या वितरणावर आळा बसण्याची शक्यता असून, पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Follow Us On