situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 28 May 2025:दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक, एकावर गुन्हा दाखल

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने एका व्यक्तीवर कारवाई केली. त्याच्याकडून साडेतीन हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी (२७ मे) सायंकाळी ताथवडे येथे करण्यात आली.

रामू नरसप्पा कोडेल (५५, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार शेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील अशोकनगर चौकात गुन्हे शाखा युनिट चारने एका दुचाकीला अडवले. त्याच्या दुचाकीवर असलेल्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये साडेतीन हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारू आणि ८० हजारांची दुचाकी जप्त केली आहे.

Pune Crime News 28 May 2025: विठ्ठलवाडी बसस्टॉपवर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले


गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

गांजा विक्री प्रकरणी दिघी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ८७७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (२६ मे) रात्री डुडुळगाव येथे करण्यात आली.

गणेश नागेश लोंढे (२३, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुधीर डोळस यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुडुळगाव येथील अडबंगनाथ चौकात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत गणेश लोंढे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४३ हजार ८५० रुपये किमतीचा ८७७ ग्रॅम गांजा आणि ३५० रुपये रोख रक्कम असा एकूण ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


कंपनीतून तांब्याची तयार चोरी करताना कामगार पकडला

कंपनीच्या मेंटेनन्स विभागात काम करणाऱ्या कामगाराने त्याच्या दुचाकीमधून तांब्याची तयार चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२६ मे) रात्री महाळुंगे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नटवर दीपक आकसे (२१, मोशी) असे अटक केलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अजय धरमसिंग चव्हाण (२३, चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नटवर आकसे हा महाळुंगे येथील ऍप्टिव्ह कंपनीत मेंटेनन्स विभागात काम करत होता. त्याने कंपनीतून १५ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर दुचाकीच्या डिकी मधून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या गेटवर झालेल्या तपासणी मध्ये ही चोरी उघडकीस आली.


जमीन खरेदीसाठी मदत केल्याने मारहाण

जमीन खरेदी करताना मदत केल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (२६ मे) दुपारी रहाटणी येथे घडली.

आकाश रवींद्र भालेराव (३३, रहाटणी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण देवराम नखाते (४५, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश भालेराव आणि त्यांचा मित्र निखिल नखाते हे छत्रपत्नी शिवाजी महाराज चौकातून पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपीने दोघांना अडवले. निखिल यांनी आकाश यांना जमीन खरेदीच्या वेळी मदत केल्याच्या कारणावरून आरोपीने आकाश यांना मारहाण केली. तसेच आकाश आणि निखिल यांना जीवे मारण्याची धमकी दिली.


चाकण मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून १.८५ लाखांचा ऐवज चोरीला

चाकण मध्ये पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या एमआर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. दुकानातून एक लाख ८५ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी (२७ मे) सकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी हेतू बलवंत दान (३२, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे एमआर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या काउंटर मधून एक लाख ८५ हजार ८०० रुपये रोख रक्कम चोरून नेली.

Follow Us On