situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: पिंपरी चिंचवडकरांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पाहण्याची संधी

Published On:
PCMC

महानगरपालिकेकडून २९ ते ३१ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे करण्यात आले आयोजन

Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ मे २०२५ याकाळात ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवा दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आणि चिंचवड मधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट, लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. तर, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमाताई खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे हे देखील या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ चे व्यवस्थापन मुंबा फिल्म फाउंडेशन करत असून पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे देखील या महोत्सवासाठी सहकार्य करीत आहे. या महोत्सवाचा उद्देश केवळ दर्जेदार चित्रपट सादर करणे नाही, तर युवा पिढीला प्रेरणा देणे, सामाजिक भान निर्माण करणे आणि पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक चित्रपट नकाशावर अधोरेखित करणे हे आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Pune Crime News 28 May 2025: विठ्ठलवाडी बसस्टॉपवर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

महोत्सवाची ही आहेत वैशिष्ट्ये

३९ देशांतील निवडक चित्रपटांचा समावेश
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व समीक्षकांची उपस्थिती
मराठी चित्रपटावर तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर आधारित चर्चासत्र
नवोदित चित्रपटकार व विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील मंच
मराठी, हिंदी, इंग्रजी व विविध परदेशी भाषांतील चित्रपट

येथे होणार महोत्सव

  • ग. दि. माडगूळकर सभागृह, सेक्टर २६, प्राधिकरण, निगडी, पिंपरी-चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ४११०४४
  • महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र, छत्रपती संभाजी नगर, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र – ४११०४४
    ……..

    शहरातील चित्रपट रसिकांना पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून देश विदेशातील चित्रपट, लघुपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमांतून शहरात चित्रपट संस्कृती रुजण्यास मोठी मदत मिळणार आहे.
  • शेखर सिंह , आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ————–

पिंपरी चिंचवडकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशातील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. चित्रपटांवर आधारित चर्चासत्र देखील या महोत्सवात होणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी ही एक पर्वणीच आहे.

  • विजयकुमार खोराटे , अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……

Follow Us On