स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपातर्फे आदरांजली
Team MyPuneCity – “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार हे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले त्याग आणि समर्पण हे अतुलनीय आहे. सावरकरांनी ‘हिंदुत्वा’ची संकल्पना मांडून देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञाननिष्ठा, सामाजिक सुधारणा आणि भाषाशुद्धी यावर त्यांनी भर दिला. आजच्या युवा पिढीने सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
Lonavala Crime News : डॉक्टर दाम्पत्याचे हातपाय बांधून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी कार्यक्रम पार पडला. प्रसंगी, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची माहिती(Pimpri) दिली.
या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, मंडल अध्यक्ष अनिता वाळुंजकर, मंगेश धाडगे, प्रभाग सदस्य वैशाली खाडये, उपाध्यक्ष कैलास सानप, सचिन राऊत, प्रदीपकुमार बेंद्रे, नेताजी शिंदे, संयोजक नंदू कदम, विजय शिनकर, चिटणीस भूषण जोशी, गणेश आर. ढाकणे, बेटी बचाव जिल्हा संयोजक प्रीती कामतीकर, सतीश नागरगोजे, सचिन बंदी, गणेश वाळुंजकर, मनोज ब्राह्मणकर, संजय परळीकर, अमेय देशपांडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन (Pimpri) केले.