Team MyPuneCity –साते येथील (Sate News) यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे यांची तर कार्यकारी संचालकपदी भारत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळ तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील पहिली कोअर बँकिंग प्रणाली असलेली संगणीकृत पतसंस्था म्हणून ओळखली जाते. सदर पतसंंस्थेची सन २०२५ ते २०२९ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
वडगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात पदाधिकारी निवड घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आगळमे (Sate News), कार्यकारी संचालक काळे उपाध्यक्ष पदी दत्तात्रय मोहिते तर खजिनदार पदी भरत आगळमे व सह खजिनदार पदी दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Sunil Shelke: मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार
यावेळी नवनिर्वाचित संचालक सचिन आवटे,विजय उभे, संभाजी बोऱ्हाडे, नामदेव गाभणे, बबन गावडे, मारुती आगळमे, समीर आगळमे, लक्ष्मीबाई आगळमे, भारती सातकर, चंद्रकांत भालेकर आदी नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.
संपूर्ण मावळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेचे एकूण २३७० सभासद असुन संस्थेची उलाढाल ५५ कोटी ६५ लाख एवढी आहे. संपूर्ण कोअर बँकिंग प्रणाली विकसित असलेल्या पतसंस्थेचे सभासदांसाठी मोबाईल बॅकिंग, एसएमएस बँकिंगसह अनेक ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. विविध आकर्षित ठेवी व शेतकरी, कामगार व उद्योग व्यवसायींकांसाठी कर्ज योजना उपलब्ध आहेत.
यावेळी अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब आगळमे (Sate News) यांनी निवडीनंतर बोलताना म्हणाले की,भविष्यात पतसंस्था शेतकरी, कामगार व लघुउद्योजक यांच्या पाठीशी उभी राहिल व सामाजिक सहकार चळवळ व पतसंस्था अधिक बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाच्या माध्यमातून कार्यरत राहील अशी भावना व्यक्त केली.