Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित २००९ साली स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या ( S. B. Patil Institute) नामवंत व्यवस्थापन महाविद्यालयाने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून शैक्षणिक स्वायत्तता (‘अकॅडमिक ऑटोनॉमी’) बहाल करण्यात आली आहे. ही स्वायत्तता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या १९९० पासून कार्यरत असलेल्या ख्यातनाम शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत कार्यरत ( S. B. Patil Institute) आहे. विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने ही संस्था अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यात यशस्वी ठरली आहे.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था नॅक कडून ए प्लस श्रेणीत मानांकित असून, एनबीए मान्यताप्राप्त दोन वर्षांचा पूर्ण वेळ व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए) येथे चालवला जातो. ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. एसबीपीआयएमने आतापर्यंत अनेक शैक्षणिक सन्मान व पुरस्कार प्राप्त केले आहेत. या संस्थेचे बरेचसे विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध नामवंत संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. एसबीपीआयएमला ‘अकॅडमिक ऑटोनॉमी’ मिळाल्या बद्दल पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
Pune : एस आर ए अधिकाऱ्यांसमोर भीम नगर पुनर्वसीत नागरिकांचा आक्रोश
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, एसबीपीआयएमने गुणवत्ता आणि शिस्तीच्या माध्यमातून आजवर केलेली वाटचाल प्रेरणादायी आहे. ही शैक्षणिक स्वायत्तता संस्थेला स्वतंत्र, नाविन्यपूर्ण व उद्योगाभिमुख शिक्षण देण्यासाठी( S. B. Patil Institute) सक्षम बनवेल.
पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले म्हणाल्या की, एसबीपीआयएम मधून शिकणारे विद्यार्थी उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षित होत आहेत. यामुळे त्यांचे करिअर अधिक बळकट होईल. ही संधी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.”
पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि नवकल्पनांना उत्कृष्ट दर्जाचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम एसबीपीआयएम समर्थपणे करीत आहे.
पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांनी नमूद केले की, “विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्याने येथील विद्यार्थी अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण काम करून देशाच्या विकासात हातभार लावत आहेत.
पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, एसबीपीआयएम आता जागतिक ट्रेंडशी सुसंगत मूल्यवर्धित अभ्यासक्रम राबवू शकेल, जे आमच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेला सामोरे जाण्यास मार्गदर्शक ठरतील.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनीही एसबीपीआयएमच्या प्राध्यापकांचे अभिनंदन करताना सांगितले की, संस्थेचा संपूर्ण विकास हीच आमची प्राथमिकता आहे. शैक्षणिक स्वायत्ततेमुळे आता अधिक गुणवत्ता साधता ( S. B. Patil Institute) येणार आहे.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर म्हणाल्या,”ही शैक्षणिक स्वायत्तता हे केवळ एक सन्मान नाही, तर एसबीपीआयएम च्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीला दिशा देणारा टप्पा आहे. आम्ही आता उद्योगानुरूप अभ्यासक्रमांची रचना करू, संशोधनाला चालना देऊ, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण राबवू आणि जागतिक ट्रेंडशी सुसंगत अधिक सक्षम विद्यार्थी ( S. B. Patil Institute) घडवू .”