situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी पूर्वनियोजन बैठक संपन्न

Published On:

Team MyPuneCity –आज दि.२७ रोजीआळंदी नगरपरिषदेमध्ये आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा पूर्व नियोजन बैठक उपविभागीय अधिकारी खेड,अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपविभागीय अधिकारी यांना पालिका ,ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभाग, पीडब्ल्यूडी ,विद्युत विभाग , पोलीस प्रशासन अश्या विविध विभागांमार्फत आलेलेल्या आधिकरी प्रतिनिधी यांनी प्रस्थान सोहळ्या निमित्त होत असलेल्या नियोजन कार्याबाबत माहिती दिली.

उपविभागीय अधिकारी यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन सूचना करत म्हणाले पीडब्ल्यूडी यांनी पावसाळा पाहून योग्य नियोजन करत रस्ते खड्डे बुजवावेत.आरोग्य विभागाने हॉटेल व्यवसायिक यांचे अन्न पाणी नमुने तपासणी करावी. पालिकेने मंदिर परिसरा जवळ व प्रदक्षिणा रस्त्यावर कोणाची तमा न बाळगता अतिक्रमण कारवाई व्हावी.शहरातील ठिक ठिकाणची फुटपाथ अतिक्रमणे काढावीत.मोबाईल टॉयलेट येथे स्वच्छ्ता व मुबलक पाणी पुरवठा व्हावा.विद्युत विभागाने विद्युत डीपी यांची झाकणे बसवणे तसेच तारजोडणीची किरकोळ कामे व्यवस्थित पणें पूर्ण करावीत.नागरिकांच्या तक्रारी नुसार व पालिकेच्या मागणी नुसार रस्त्यामध्ये व वाहतुकीला अडसर होत असलेले विद्युत खांब काढण्यात यावेत.आळंदी लगत ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर कचरा होऊ नये. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना सूचना कराव्यात.आषाढी वारी प्रस्थान सोहळ्या वेळी भाविकांना इंद्रायणी नदी पात्रात मुबलक पाणी असावे.वारी काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व विभागाने दक्षता घ्यावी.प्रत्येक विभागात एक पर्यायी अधिकारी असावा ज्याने एका अधिकाऱ्याशी संपर्क झाला नाही तर पर्यायी अधिकाऱ्याशी संपर्क साधला जाऊ शकेल. अश्या सूचना करण्यात आल्या.

Pune: महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते – लक्ष्मण गायकवाड


मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आषाढी वारी पूर्व नियोजन संदर्भात माहिती देत असताना सांगितले वारी काळात आळंदी नगरपरिषदेचे विभाग निहाय जबाबदार अधिकारी नेमले आहेत.या वारीसाठी तैनात आळंदी नगरपरिषद यंत्रणे मध्ये १७ अधिकारी ,२००कर्मचारी,१५० स्वयंसेवक, फिरते टॉयलेट्स करिता पाणी पुरवठा करण्यासाठी १८ टँकर्स ,पिण्याच्या पाण्यासाठी १५ टँकर्स,१० घंटागाड्या,५ टॅक्टर, सक्शन मशीन २०, कॉम्पॅक्टर ३,सफाई मशीन १ ,अग्निशमन वाहने ३,रेस्क्यू बोट ३ असणार आहे. आळंदी शहरातील सर्व ड्राईनेजलाईन व स्ट्रोम वॉटर साफ सफाई करण्यात येणार आहे.

आरोग्य विभाग

१)भाविकांसाठी जिल्हा परिषद अंतर्गत भाविकांसाठी मोबाईल टॉयलेट्स सुविधा होणार आहे.

२)सार्वजनिक सर्व शौचालयाची साफ़ सफाई करण्यात आली असून दैनंदिन सफाई करण्यात येणार आहे.

३)शहरातील एकूण १४ सार्वजनिक शौचालयच्या ठिकाणी स्वच्छतेच्या व केओटेकर सुविधा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

४)शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्याची साफ सफाई करण्यात येणार आहे.

५)धूर फवारणी व औषध फवारणीचे दैनंदिन कामे इ.

पाणी पुरवठा विभाग

१)शहरातील मुख्य व अंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीचे कामे सुरू करण्यात आली आहे.
२)शहरातील विविध ठिकाणच्या पाईपलाईनचे गळतीचे काम थांबविण्यात आले .
३)जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड अशी विविध दुरुस्ती कामे पूर्ण.
४)टँकरना पाणी भरण्यासाठी शहरात विकेंद्रित पध्दतीने ४ फिलिंग ठिकाणे निश्चित करण्यात आली.
५)नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व पंप व मोटारीची देखभाल दुरुस्ती कामे सुरू करण्यात आले.
६)यात्रा कालावधीत २४ तास पाणी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात येणार.
७)शहरातील धर्मशाळा/मठ यांचे मागणी नुसार पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणार येणार आहेत.
८)लिकेज द्वारे वाया जाणाऱ्या पाण्याचा पुर्नवापर करून जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमता वर्धनाचे काम पूर्ण.
९)वारकऱ्यांना स्वच्छ पाण्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी १५ टँकर शहरात तैनात असणार.

संगणक विभाग

१)पोलीस विभागास चोरींच्या घटनांवर लक्ष ठेवणे सोपे व्हावे यासाठी आळंदी नगरपरिषदे मार्फत शहरात ६० ठिकाणी एकूण १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यांचे कंट्रोल रूम आळंदी पोलीस स्टेशन कार्यालयात असणार आहे. यामुळे चोरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.

२)पोलीस कंट्रोल रूम मध्ये ५५ इंच एल इ डी टीव्हीवर थेट प्रेक्षपण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

३)आळंदी नगरपरिषद कार्यालया मार्फत झाडी बाजार येथील वाहनतळ ,शिवसृष्टी, हरिपाठ बाल उद्यान ,तुळशी वृंदावन ,चांगदेव गर्वहरण शिल्प इ.महत्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी कायम स्वरूपी सीसीटीव्ही बसविणेचे कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

४)पोलीस विभागाच्या सूचना नुसार व मागणी नुसार आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांसाठी एकूण १८०० फिरते शौचालय असणार आहे.नदी घाटावर महिलांसाठी चेजिंग रुम व्यवस्था करण्यात येणार आहे.

डी डी भोसले पाटील यांनी वीज समस्या, वाहतूक समस्या, शहरातील खड्डे ,विजेचे रस्त्या मध्ये आलेले विजेचे खांब ,दर्शनबारी व्यवस्था, स्काय वॉक पूल निर्मिती, अतिक्रमण याबाबत इ.माहिती दिली.

पावसाळ्या निमित्त शहरात आरोग्य बूथची निर्मिती करताना पावसा मध्ये बूथ मध्ये कोणीही भिजू नये अशी व्यवस्था करावी.अशी मागणी यावेळी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ उर्मिला शिंदे यांनी केली.

बैठकी पूर्वी जिल्हाधिकारी यांचे आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आगमन झाले. यावेळी त्यांनी मंदिर व्यवस्था व वैतागेश्वर मंदिर लगत दर्शनबारी स्थळांची पाहणी केली.

Follow Us On