Team MyPuneCity – वारजे परिसरातील गोकुळ नगर येथे मेसर्स (Pune) भक्ती इंटरप्राईजेस या बिल्डरच्या वतीने करण्यात आलेल्या एसआरए पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना यादव यांच्यासमोर आपल्या तक्रारीचा पाढा वाचला. आपल्या व्यथा मांडत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. पिण्याच्या पाण्याची समस्या, छत गळती तसेच आजूबाजूची दुर्गंधी व सुमारे आठ वर्षापासून बंद असलेली लिफ्ट इत्यादी तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या या अधिकाऱ्यांसामोर मांडल्या.
Crime news : ब्रँड स्टिकरचा वापर करून बेकरी प्रोडक्टची विक्री
दरम्यान, भीम नगर पुनर्वसन प्रक्रियेतील विकसक असलेल्या भक्ती इंटरप्राईजेसने नागरिकांची फसवणूक करून; स्थलांतरित पुनर्वसन प्रकल्पाचा घाट घातला होता. एकही मूळ पुनर्वसन लाभार्थी या ठिकाणी गेलेला नाही. तसेच योजना पूर्ण झाली असे दाखवून टीडीआरचा लाभ घेण्यासाठी विकसकाने खोटे लाभार्थी उभे केले होते; त्यांना या घरांचा ताबा देखील दिला होता. या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी भीम नगरच्या नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून जन आक्रोश आंदोलन सुरू केले. त्यानंतर आज एस आर ए अधिकाऱ्यांना जाग आली असून त्यांनी वस्तुस्थिती पाहण्यासाठी आज भक्ती इंटरप्राईजेस ने उभा केलेल्या वारजे येतील पुनर्वसन प्रकल्पाला भेट (Pune) दिली.
मात्र वरील बाबी समोर आल्या नागरिकांनी विचारलेल्या व उपस्थित केलेल्या प्रश्नांना कोणतेही समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही त्यामुळे नागरिकांचा संताप आणखीनच (Pune) वाढला आहे.