बेकरी दुकानदारावर गुन्हा दाखल
Team MyPuneCity – बेकरी उत्पादने विकण्यासाठी (Crime news)ब्रँड स्टिकरचा वापर करून बेकरी उत्पादने विक्री केली. याप्रकरणी बेकरी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (२६ मे) दुपारी त्रिवेणीनगर येथील बेस्ट बेकरी येथे करण्यात आली.
साजीद असगरअली अन्सारी (३४, भोसरी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद ताजीम मोहम्मद यामीन शेख (३६, त्रिवेणीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शेख याचे त्रिवेणीनगर येथे बेस्ट बेकरी नावाने दुकान आहे. शेख याने त्याच्या बेकरी मध्ये पूनम बेकरीच्या ब्रँड स्टिकरचा वापर बेकायदेशीरपणे केला. ब्रँड स्टिकर बेकरी उत्पादनांवर चिकटवून त्यांची विक्री केली. साजिद अन्सारी यांनी पोलिसांच्या मदतीने बेकरीमध्ये कारवाई केली. या कारवाईत ११ हजार ५०० रुपये किमतीचे स्टिकर आढळून (Crime news) आले.