situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : पुण्यात कोयता गँगची दहशत… सिंहगड रोडवरील वडगावमध्ये टोळक्याने तरुणावर केला कोयत्याने वार ; 22 गाड्यांची केली तोडफोड

Published On:
Pune Crime News

Team MyPuneCity – पूर्व वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवत सिंहगड रोडवरील ( Pune Crime News ) वडगाव बुद्रुक भागात तरुणावर कोयत्याने वार करत २२ गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी ज्ञानेश शामराव संकपाळ (वय २७, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश संकपाळ व साई उमाप यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. रविवारी रात्री पावणे दहा वाजता ज्ञानेश संकपाळ हे घराबाहेर उभे होते. त्यावेळी साई उमाप रिक्षा घेऊन आला. त्याचे साथीदार मोटारसायकलवर आले. साई याने रिक्षा संकपाळ याच्या समोर थांबवली. चौघे संकपाळ याच्याकडे आले. साई उमाप याने कोयता उगारुन “तुला आता संपवतो,” असे म्हणून कोयत्याने संकपाळ याच्यावर वार केला.

Dehu ATM News : देहूमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक, तिघे पसार

तो त्याच्या उजव्या खांद्यावर लागला. दुसरा कोयत्याने वार करु लागला. तो संकपाळ याने उजव्या हाताने पकडला. त्यावेळी त्याच्या हाताला गंभीर जखम होऊन रक्त येऊ लागले. चौघे जण त्याला मारत असतानाच त्याचे चुलते सोमनाथ संकपाळ यांनी ज्ञानेश संकपाळ याला ( Pune Crime News ) घरामध्ये ओढले.

तेव्हा त्यांनी घराबाहेर असलेल्या मोटारसायकलवर कोयत्याने वार करुन तिचे नुकसान केले. तेथून जाताना चौघांनी मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडओरड करण्यास सुरुवात केली. ‘‘आम्हीच या भागातील भाई आहोत, आमच्या वाटेला जाणार्‍यांना आम्ही असेच मारणार’’ असे म्हणत त्यांनी त्या ठिकाणी लोकांनी पार्क केलेल्या दुचाकी, तीन चाकी रिक्षा, चारचाकी कार, टेम्पोंवर कोयत्याने वार करुन त्यांची तोडफोड केली.

दहशत माजवत त्यांनी २२ गाड्यांची तोडफोड केली. ज्ञानेश संकपाळ याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपीचा शोध घेऊन साई उमाप याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करीत ( Pune Crime News ) आहेत.

Follow Us On