Team MyPuneCity-वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी आश्रय घेतला असल्याचे समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी (26 मे) ही कारवाई केली आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (47, कोगनोली, तहसील चिकोडी, बेळगाम, कर्नाटक) असे माजी मंत्र्याच्या मुलाचे नाव आहे. त्याच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (60, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फटक (55, लोणावळा), अमोल विजय जाधव (35 पुसेगाव, खटाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (४५, पुसेगाव, खटाव, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
Bhimashankar: भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस ;नदी नाल्यांना पूर
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राजेंद्र आणि सुशील हे दोन आरोपी फरार होते. सात दिवसानंतर त्यांना स्वारगेट मधून अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी वडगाव मावळ, लोणावळा, सातारा तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपींना आश्रय देणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.
काँग्रेस आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने हगवणे पिता पुत्राला आश्रय दिल्याचे कनेक्शन समोर आले आहे. वीरकुमार पाटील 28 वर्ष काँग्रेसचे आमदार होते. वीरकुमार पाटील त्यांच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री देखील होते.