situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala MNS : लोणावळा शहरात मनसेचा खळबळजनक आरोप : ९.५४ कोटींच्या कचरा कंत्राटात मोठा घोटाळा?

Published On:
Lonavala MNS
---Advertisement---

Team MyPuneCity – शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात तब्बल ९.५४ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेच्या या आरोपामुळे लोणावळा शहरात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई (MNS in Lonavala) करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोणावळा नगरपरिषदेने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील कचरा संकलन, विल्हेवाट, डेपो व्यवस्थापन, गार्डन देखभाल आणि सुरक्षा रक्षक पुरवठ्यासाठी एका खासगी कंपनीसोबत ९.५४ कोटी रुपयांचे कंत्राट केले होते. मात्र, मनसेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कंत्राटातील गंभीर अनियमितता उघड करत नगरपरिषदेच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Rain in Lonavala : लोणावळ्यात रविवारी ढगफुटीचा कहर; शहरात २४ तासांत २३२ मिमी पावसाची नोंद, काही घरात पाणी शिरले

प्रमुख आरोपांनुसार, मुख्याधिकारी यांनी २० मार्च २०२५ रोजी एका ‘बोगस’ भंगार विक्रेत्यासोबत नोटरी करार केला असून, संबंधित व्यक्तीचा पत्ता करारनाम्यात व स्टॅम्प पेपरवर वेगवेगळा नमूद आहे. इतकंच नव्हे तर, ती व्यक्ती अस्तित्वातच नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ९३ नुसार मुख्याधिकाऱ्यांना असा करार करण्याचा अधिकार नसताना त्यांनी हा बेकायदेशीर करार केला, असा आरोप मनसेने केला आहे.

याशिवाय, कचरावेचकांना ओळखपत्र न देणे, कचरा संकलन करणाऱ्या खासगी कंपनीचे सुरक्षा रक्षक ऑन ड्युटी असताना गांजाचे सेवन करत असल्याचे प्रकार, तसेच करारात नमूद अटींचे उल्लंघन हे प्रकारही उजेडात आले आहेत. या सगळ्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे (MNS in Lonavala) आहे.

या पार्श्वभूमीवर या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल भोसले, रमेश म्हाळसकर, शहर प्रवक्ते अमित भोसले, मधुर पाटणकर, अभिजीत फासगे, संगीता गुजर, दीपमाला बोभाटे, माधुरी साठे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, विश्रांत साठे, आकाश लोंढे, सिद्धार्थ कांबळे, साहिल सांडे, जुबेर मुल्ला तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (MNS in Lonavala) होते.

Follow Us On