आळंदी, दि. २६ : आळंदीतील (Alandi News) वैभवी श्रीराम मंदिर येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान न्यासाच्या विश्वस्तपदी सामाजिक कार्यकर्ते व आळंदी जनहित फाउंडेशनचे मार्गदर्शक, पत्रकार अर्जुन निं. मेदनकर व सामाजिक कार्यकर्ते अविनाश गुळुंजकर यांची नुकतीच (दि. २१ मे) नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीनंतर प्रथम त्यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अनेक ग्रामस्थ नागरिक त्यांच्यासोबत उपस्थित होते. नियुक्तीची बातमी समजताच सोशल मीडियावरून, फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून अनेकांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या.
Alandi: मोकाट जनावरांचा शिवसृष्टी समोरील झाडांना त्रास होऊ नये म्हणून पालिकेच्या वतीने जाळीचे काम
ग्रामस्थांच्या वतीने अविनाश गुळुंजकर (Alandi News) यांचा सत्कार संतोषी माता मंदिराजवळ करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, अभिषेक कुऱ्हाडे, संजय कुऱ्हाडे, सोमनाथ कुऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, दिनांक २५ रोजी अर्जुन मेदनकर यांचा सत्कार स्वकुळ साळी समाज ज्ञातीगृह येथे ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जय श्रीराम, हरिनाम जयघोषात करण्यात आला.
इस्रायलचा गाझामध्ये नरसंहार सुरुच, बालवाडी शाळेवर केलेल्या हल्ल्यात 25 जण जिवंत जळाले
या सत्कार सोहळ्यास (Alandi News) ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, स्वकुळ साळी ज्ञातीगृहाचे खजिनदार मनोहर दिवाणे, उपाध्यक्ष अमित उगले, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे पाटील, भिमाजी घुंडरे पाटील, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, रोहिदास कदम, माऊली उर्फ घुंडरे पाटील, कीर्तनकार तुकाराम महाराज ताजणे, दिलीप महाराज ठाकरे, विश्वकर्मा महाराज पांचाळ, कल्याण महाराज कल्याणकर, मनसेचे तुषार नेटके, आळंदी जनहित फाउंडेशनचे रामदास दाभाडे, कृष्णाजी डहाके, दत्तात्रय डफळ, भाजप नेते मंडू आदी मान्यवर उपस्थित होते.