Team MyPuneCity –आळंदी येथे नगरपालिका चौकात पालिकेच्या वतीने सुंदर अशी शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे.बागेतील सुक्षतेच्या दृष्टीने योग्य त्या ठिकाणी स्टीलचे अँगल लावण्यात आले असले तरी त्या अँगल मधून व काही त्यावर चढून शेळ्या छोट्या झाडांची पाने व फांद्या खात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाला होता. शिवसृष्टी समोरील असलेल्या त्या सर्व झाडांचे व्यवस्थित पणे संवर्धन व्हावे व मोकाट जनावरांपासून त्या झाडांना त्रास होऊ नये याकरिता उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
Dehugaon: देहूत देशी वृक्षांचे वृक्षारोपण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची तत्काळ दखल पालिकेच्या वतीने घेण्यात आली.व मोकाट जनावरांचा त्रास तेथील झाडांना होऊ नये यासाठी शिवसृष्टी समोरील बागेच्या अँगलसना पालिकेच्या वतीने जाळी बांधण्याचे कार्य सुरू केले. पालिकेने तत्काळ दखल घेतल्या बद्दल नागरिकांने पालिकेचे आभार मानले.

