situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 25 May 2025 : क्रेडिट कार्ड रिवॉर्डच्या नावाखाली ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपळे सौदागर येथील एका तरुणाची क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सच्या आमिषाने तब्बल ६५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १ मे २०२५ रोजी दुपारी घडली. पीडिताच्या मोबाईलवर स्वतःला बँकेची प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेचा फोन आला होता.

या प्रकरणी पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Dehugaon: देहूत देशी वृक्षांचे वृक्षारोपण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताशी फोनद्वारे संपर्क साधून एका महिलेने सांगितले की, त्याच्या बँकेमार्फत क्रेडिट कार्डच्या बिलावर रिवॉर्ड पॉइंट्सद्वारे सूट दिली जात आहे. पुढे बोलताना तिने सांगितले की, तिचा सहकारी पुढील माहिती देईल. काही वेळातच दुसऱ्या एका नंबरवरून एका पुरुषाचा फोन आला. त्यानेही स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले आणि एक लिंक पाठवून त्यामध्ये आवश्यक माहिती भरण्यास सांगितले. पीडिताने त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरली. काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून ६५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने कापले गेले. फसवणुकीचा संशय येताच पीडिताने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.


विनाकारण व्यवसायिकाला बेदम मारहाण

विनाकारण तिघांनी मिळून एका व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (२४ मे) सकाळी खेड मधील कुरुळी येथे घडली.

सागर सुनील गायकवाड (३६, कुरुळी, खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी सुरेश गायकवाड (४०), अमोल सुरेश गायकवाड (३६), सचिन अरुण गायकवाड (२८, कुरुळी, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गायकवाड आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपींनी सागर यांना कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने मारून गंभीर जखमी केले. तसेच सागर यांच्या कारची काच फोडून नुकसान केले.


कामगाराने केली कंपनीत चोरी

तळवडे येथील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून ७४ हजार रुपये किमतीचे दाटूचे पार्ट चोरून नेले. ही घटना ४ मे ते ६ मे या कालावधीत पुणे कार्बन प्रा ली येथे घडली.

मोहसीन आत्तार (विकासनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक सुरिंदरपालसिंग चरणजितसिंग गुलाटी (७५, बाणेर, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन आत्तार हा फिर्यादी गुलाटी यांच्या पुणे कार्बन या कंपनीत काम करत होता. त्याने कंपनीतून कॉपर आणि टंगस्टन धातूचे ७४ हजार ७११ रुपये किमतीचे पार्ट कंपनीतून चोरून नेले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


एमडी ड्रग्स विक्री प्रकरणी प्रकरणी तरुणास अटक

मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ११.०३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (२३ मे) रात्री वडमुखवाडी येथे करण्यात आली.

समीर सलीम खान (२५, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी येथे एक तरुण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून समिर खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११.०३ ग्रॅम एमडी ड्रग्स, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण दोन लाख पाच हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक, एकास अटक

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (२४ मे) दुपारी बिरदवडी येथे करण्यात आली.

दीपक दत्तात्रय पवार (३५, पोखानापूर, हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष फटांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पवार याने दोन जनावरांना टेम्पोमध्ये करकचून बांधले. त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीच्या दोन जनावरांची सुटका केली आहे.

Follow Us On