Team MyPuneCity – देहूगाव येथील गायरानात वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून गौरव महानुभवांचा…. संकल्प पर्यावरण संवर्धनाचा…या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांची अमृत महोत्सवाकडे वाटचाल होत असताना त्यांच्या गौरवार्थ श्रीक्षेत्र देहू येथील गायरानात उभारण्यात आलेल्या अभंग गाथा वनामध्ये ७५ स्वदेशी वृक्षांची लागवड त्यांच्या हस्ते करण्यात आली.
बंडातात्या कराडकर यांनी भजन, कीर्तन, प्रवचना द्वारे महाराष्ट्राच्या खेडो पाड्यातून आध्यात्मिक प्रबोधना द्वारे हजारो विद्यार्थी घडविले. महाराष्ट्रातील गावगावात बाल संस्कार शिबिरांची संकल्पना राबविली.
Pune: पुण्यात वस्तीमध्ये वेगात गाडी चालवण्यास विरोध केल्याने दोन जणांकडून पिस्तुलातून गोळीबार; आरोपी अटकेत
पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदर्श हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांच्या पासष्टीत निमित्त त्यांच्या हस्ते येथे ६५ स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात जलनितीचा वापर करून आपल्या संपूर्ण गावाला पाण्याचे महत्व पटवून देऊन जलसंधारणासाठी माळरानावरती लाखो वृक्षांची लागवड करून गावच्या पाणी पातळीमध्ये त्यांनी वाढ केली व गावाला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ज्यांनी बहुमान मिळवून दिला आहे.