situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 25 May 2025 : ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –लक्झरी वस्तूंमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने खडकीतील एका तरुणाची तब्बल ५ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वाकडेवाडी येथे राहणारे २९ वर्षीय युवक असून, २२ ते २७ एप्रिलदरम्यान ही फसवणूक झाली. आरोपींनी टेलीग्राम व व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून फिर्यादीला संपर्क करून त्यास ऑनलाईन गुंतवणुकीसाठी प्रेरित केले. नफ्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास लावले. अशा प्रकारे एकूण ₹५,५८,७७१/- ची फसवणूक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे करीत आहेत.


बनावट पोलिसाची ओळख देत २० लाखांची ऑनलाईन फसवणूक

पोलीस असल्याचे भासवून येरवड्यातील एका तरुणाची तब्बल २० लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हा २७ वर्षीय युवक असून, १० ते १३ मेदरम्यान अज्ञात आरोपीने त्यास कॉल करून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवली. विश्वास संपादन करून त्याच्याकडून ₹२०,२४,५३१/- रक्कम ऑनलाईन पद्धतीने उकळली. तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकर करीत आहेत.


बसमध्ये गर्दीचा फायदा घेत सोन्याची बांगडी चोरली

सार्वजनिक बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेकडील ₹७० हजार किमतीची सोन्याची बांगडी लंपास केली. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या ६६ वर्षीय महिला असून, २३ मे रोजी सायंकाळी कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र चौकाजवळ पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत ही चोरी केली. पुढील तपास पोलीस अंमलदार शिरसाट करीत आहेत.


जुन्या वादातून तरुणाला मारहाण करून सोनसाखळी लंपास

जुन्या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील तीन लाखांची सोनसाखळी हिसकावण्यात आली. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी हा ३३ वर्षीय तरुण असून, रामोशी गेट चौकात मित्रासोबत उभा असताना आरोपी विक्रांत गिते (वय ३२, रा. भवानीपेठ) याने त्यास शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याच्या गळ्यातील ₹३ लाखांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत.


शेजारील वृद्धेच्या घरात मध्यरात्री घुसून १२ लाखांचा ऐवज लांबवला

कुंजीरवाडी परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात मध्यरात्री शिरून चोरट्यांनी तब्बल १२ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी या ७० वर्षीय महिला असून, २४ मे रोजी पहाटे त्यांच्या देवघराच्या खिडकीचे गज उचकटून आरोपीने घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि रोख रक्कम व दागिने असा एकूण ₹१२,०२,०००/- किमतीचा ऐवज चोरून नेला. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे करीत आहेत.


दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले

कोरेगाव पार्क परिसरात सकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ₹४० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ मे रोजी सकाळी सिटी पॉईंट चौकाजवळ घडली. फिर्यादी महिला या ताडीवाला रस्त्यावरील रहिवासी असून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.


जुन्या वादातून तरुणाला दगडाने मारहाण, तीन आरोपी अटकेत

वडगाव शेरी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करण्यात आले. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तिघा आरोपींना अटक झाली आहे.

फिर्यादी हा मुंढवा येथील २१ वर्षीय युवक असून, २३ मे रोजी रात्री त्याच्यावर गगन शिंदे, अभिजीत संपत्ते, आकाश वेली व इतर दोघांनी हल्ला केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक अजय असवले करीत आहेत.

Follow Us On