situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khopoli Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण साखळी अपघात; अनियंत्रित ट्रेलरने ७ वाहनांना दिली धडक; २ महिला ठार

Published On:
Khopoli Accident
---Advertisement---

Team MyPuneCity – यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ शनिवारी (२४ मे) दुपारी एक भयावह अपघात (Khopoli Accident) घडला. भरधाव वेगात असलेल्या एका अनियंत्रित ट्रेलरने सात वाहनांना धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हा अपघात (Khopoli Accident) दुपारी चारच्या सुमारास खोपोलीजवळील किलोमीटर ३७ परिसरात, मुंबई मार्गिकेवर घडला. शनिवारी सुट्टी असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक होती. याच दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारा एक ट्रेलर अचानक ब्रेक न लागता पुढे असलेल्या वाहनांवर आदळला.

Khandala Car Fire : खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ धावत्या कारला अचानक आग; चालकाचा प्रसंगावधानाने जीव वाचला

ट्रेलरने सुरुवातीला एका इर्टिगा कारला धडक दिली, त्यानंतर सियाझ आणि ह्युंदायी या दोन कार्स तसेच एका बसला जोरदार ठोकर दिली. यानंतर स्विफ्ट कारला पाठीमागून धडक देत तिने समोरील बसच्या केबिनमध्ये घुसखोरी केली. स्विफ्टमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.

या अपघातात (Khopoli Accident) स्विफ्ट कारमधील अश्विनी अक्षय हळदणकर (वय अंदाजे ३०, रा. कोल्हापूर) आणि श्रेया संतोष अवताडे (वय १७, रा. घाटकोपर) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींमध्ये वसुधा विजय जाधव (रा. कोल्हापूर), सारिका अवताडे (रा. घाटकोपर), सारिका विजय जाधव (वय ९), अविनाश विजय जाधव (वय ३, रा. कोल्हापूर) आणि अक्षय हळदणकर यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, देवदूत आपत्ती व्यवस्थापन पथक, हेल्प फाउंडेशन व खोपोली पोलीस घटनास्थळी (Khopoli Accident) दाखल झाले. त्यांनी तत्काळ मदत व बचावकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ही घटना खोपोली पोलीस ठाणे हद्दीत घडली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us On