situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kharadi Crime News: खराडीत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा; पाच जण अटकेत, १३.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On:

Team MyPuneCity -अमेरिकेतील नागरिकांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून त्यांच्याकडून यु.एस. डॉलर्समध्ये कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. यामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे १३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फसवणुकीचा बेत आणि पोलिसांची कारवाई

खराडी येथील प्राईड आयकॉन बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावर ‘मैग्नेटेल बीपीएस अ‍ॅण्ड कन्सल्टन्स एलएलपी’ हे अनधिकृत कॉल सेंटर सुरु होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करून, त्यांचे अ‍ॅमेझॉन खाते बेकायदेशीररीत्या वापरले गेले असून त्याचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी झाला आहे, असे भासवत त्यांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवली जात होती. नंतर त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड खरेदी करून ती कोड आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत होते.

Pune Crime News 24 May 2025 : खराडी बायपासवर ट्रॅकरने धडक देत युवकाचा मृत्यू

सायबर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या संयुक्त कारवाईत या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. तपासात हे सेंटर विनापरवाना सुरु असल्याचे निष्पन्न झाले. सेंटरमध्ये १११ पुरुष व १२ महिला कर्मचारी अमेरिकन वेळेनुसार रात्री ६ ते पहाटे २ वाजेपर्यंत काम करत होते.

पाच आरोपी अटकेत

या कारवाईत खालील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे:

  1. सरजितसिंग गिरावतसिंग शेखावत (रा. खराडी, पुणे; मूळ रा. झुंझुनू, राजस्थान)
  2. अभिषेक अजयकुमार पांडे (रा. खराडी, पुणे; मूळ रा. अहमदाबाद, गुजरात)
  3. श्रीमय परेश शहा (रा. खराडी, पुणे; मूळ रा. अहमदाबाद, गुजरात)
  4. लक्ष्मण अमरसिंग शेखावत (रा. खराडी, पुणे; मूळ रा. अहमदाबाद, गुजरात)
  5. अॅरोन अरुमन ख्रिश्चन (रा. खराडी, पुणे; मूळ रा. अहमदाबाद, गुजरात)

जप्त मुद्देमाल आणि फसवणुकीचा डेटा

या ठिकाणी ९.६ लाख रुपये किमतीचे ६४ लॅपटॉप, ४.१० लाख रुपये किमतीचे ४१ मोबाईल फोन, ४ राउटर, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, इंग्रजी संवाद स्क्रिप्ट्स, तसेच अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल नंबरचा डेटा जप्त करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा संशय

या प्रकरणात आरोपी अमेरिकन डॉलर हवाला किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून फिरवत असल्याचा संशय असून याचा तपास तांत्रिक आणि क्लिष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. या फसवणुकीचा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांशी संबंध असल्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, प्रताप मानकर, वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, संतोष तानवडे, राम दळवी, वैभव मगदुम यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

Follow Us On