Team MyPuneCity – कारवर पाणी उडाल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी निवृत्त कॅप्टनवर रस्त्यातच हल्ला करून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना मोशी प्राधिकरण परिसरात घडली.
हल्ल्यात जखमी झालेले आशितोष हरिहर पांडे (वय ६३, रा. जलवायुविहार, मोशी प्राधिकरण, पुणे) हे भारतीय लष्करातून निवृत्त अधिकारी आहेत. गुरुवारी (२३ मे) सकाळी ९.४५ वाजता ते त्यांच्या स्विफ्ट कारने जलवायुविहारच्या मागील गेटजवळून जात होते. रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने त्यांच्या गाडीच्या चाकांमधून पाणी उडाले.
Khandala Car Fire : खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ धावत्या कारला अचानक आग; चालकाचा प्रसंगावधानाने जीव वाचला
याच कारणावरून दोन अनोळखी तरुणांनी त्यांना अडवले. त्यांनी शिवीगाळ करत कॅप्टन पांडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातील एका तरुणाने रस्त्यावर पडलेली लाकडी काठी उचलून थेट त्यांच्या डोक्यावर मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यात पांडे यांना दुखापत झाली.
या घटनेनंतर कॅप्टन पांडे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.