Team MyPuneCity – यवतमधील एका ३२ वर्षीय इसमाने आपल्या नातेवाईक तरुणीचा गळा दाबून खून (Hadapsar Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरोपी राहुल शिवाजी मिसाळ (वय ३२, रा. रायकर मळा, यवत, ता. दौंड, जि. पुणे) याने स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर राहून आपला गुन्हा कबूल करताच यवत पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांच्याकडून हडपसर पोलिसांना (Hadapsar Murder) याबाबत माहिती देण्यात आली.
या माहितीनंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस अधिकारी सत्यवान गेंड आणि त्यांच्या तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटची पाहणी करताच एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. तिचे नाव अनिता ऊर्फ कमल विक्रम लोंढे (वय २८, रा. भंडलकर नगरच्या पाठीमागे, शेवाळेवाडी फाटा, मांजरी, पुणे) असे असून ती आरोपी मिसाळ याची नातेवाईक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Ajit Pawar : वैष्णवी हगवणे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार – अजित पवार
तपासदरम्यान राहुल मिसाळ याने सांगितले की, तो आणि अनिता गेली दोन वर्षे यवत येथे एकत्र राहत होते. १८ मे रोजी ते शेवाळेवाडीत (Hadapsar Murder) नव्या ठिकाणी राहायला आले होते. मात्र २३ मे रोजी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने अनिताचा गळा दाबून खून केला.
या गुन्ह्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल मिसाळला यवत येथून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस अंमलदार सत्यवान गेंड, अनिल बिनवडे यांच्या पथकाने केली. तपास सुरू आहे.