situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon News : वडगावच्या स्वागत कमानींवर पोटोबा महाराज, महादजी शिंदे यांचे नाव देण्याची मागणी

Published On:

Team MyPuneCity – वडगाव मावळ शहराच्या (Vadgaon News) प्रवेश मार्गावरील पूर्वेकडील बाजूच्या कमानीवर देण्यात आलेले नाव व स्ट्रक्चर हे बेकायदेशीर असून त्या कमानीवर ग्रामदैवत पोटोबा महाराज यांचे नाव द्यावे व पश्चिमेकडील कमानीवर श्रीमंत महादजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वडगावकर ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, मंगेशकाका ढोरे, राजेंद्र कुडे, मनोज ढोरे, विलास दंडेल, किसन वहिले, बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब ढोरे, बाळासाहेब तुमकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

या संदर्भात बोलताना पंढरीनाथ ढोरे (Vadgaon News) म्हणाले की, आमदार सुनील शेळके यांनी दिवंगत सोपानराव म्हाळसकर यांचे नाव मुख्य रस्त्याला देण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार नगरपंचायतने ठराव मंजूर केला व हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढील कार्यवाही करावी अशी लेखी पत्र दिले होते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरची कमान वडगाव ग्रामपंचायतीकडून नगरपंचायतकडे प्रशासकीय हस्तांतरण झाली असल्यामुळे या कमानीवर नगरपंचायतचाच अधिकार आहे त्यामुळे पुढील कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने करावी, असे लेखी कळवले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील रस्त्यांवर स्वागत कमान करताना महापुरुषांची नावे देणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठीही मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असते, परंतु सदरची कमान (Vadgaon News) कुठलीही परवानगी न घेता झाली असल्यामुळे ही बेकायदेशीर आहे, असा आरोप ढोरे यांनी केला.

या बेकायदेशीर कमानीमुळे गावात वाद निर्माण होतील. वाद होऊ नये अशी आम्हा ग्रामस्थ मंडळींची इच्छा आहे. त्यामुळे सदर कमानीवर ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे नाव द्यावे व पश्चिमेकडील कमानीवर श्रीमंत महादजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ढोरे यांनी यावेळी केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे (Vadgaon News) यांनीही सदर कमान बेकायदेशीरपणे बदलण्यात आली असल्याचा आरोप करून या कमानीवर श्री पोटोबा महाराज यांचेच नाव द्यावे, अशी मागणी केली.

मनोज ढोरे यांनीही या मागणीस दुजोरा देत श्री पोटोबा महाराज व श्रीमंत महादजी शिंदे यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र कुडे, विलास दंडेल यांनीही यावेळी बोलताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे निर्णय घ्यावा व दोन्ही कमानींचे नामकरण करावे, अशी इच्छा व्यक्त केली.

या संदर्भात नगरपंचायत प्रशासन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us On