situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

ABBM Workshop : दायित्व, सेवा, समन्वय आणि हक्क या चार सूत्रांवर आधारित ब्राह्मण महासंघाचे काम – गोविंद कुलकर्णी

Published On:
ABBM Workshop

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पदाधिकारी कार्यशाळा (ABBM Workshop)

Team MyPuneCity – दायित्व, सेवा, समन्वय आणि हक्क या चार सुत्रावर आधारित महासंघाचे काम असल्याचे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पदाधिकारी मेळावा व कार्यशाळेत (ABBM Workshop) व्यक्त केले.

पुणे जिल्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पदाधिकारी मेळावा व कार्यशाळेचे (ABBM Workshop) आयोजन वेदशास्त्रोतेजक सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी बोलत होते. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे निखिल लातूरकर, केतकी कुलकर्णी, मंदार रेडे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

Rajendra Hagawane Arrested : अटकेआधी तळेगावच्या हॉटेलमध्ये मटणावर ताव, पहाटे पोलिसांच्या जाळ्यात; राजेंद्र आणि सुशील हगवणे अखेर स्वारगेट येथून अटक

पुढे गोविंद कुलकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले, ब्राह्मण्य जपत असताना समाजातील सर्व जातीबद्दल बांधिलकी सुद्धा जपली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या समाजातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने पिछेहाट होत आहे. ते टाळण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नागरिकांनी मदत करायला हवी.

राजकारणातील सहभाग वाढवायला पाहिजे तरच आपल्या समस्या सरकार दरबारी सोडविण्यास मदत होईल. आपल्या उद्योजकांच्या मार्गदर्शनातून दहा लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, यातून बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल असेही कुलकर्णी म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी येथील कार्याचा गौरव करून देवदर्शनासाठी भगिनींना मराठवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले तर जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी भविष्यातील विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरावर दोन आघाड्या निर्माण करून विकास साधणारा असून स्वतःचे भवन उभे करण्याचा मानस व्यक्त केला.

शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा; महसूल विभागाचा तब्बल 60 वर्षानंतर महत्त्वपूर्ण निर्णय

याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील महिला पदाधिकारी यांची यादी प्रदेशाला केतकी कुलकर्णी यांनी सादर केली.

प्रसिद्ध सिने अभिनेते श्री सुनील गोडबोले व राजू बावडेकर आवर्जून उपस्थित होते.

या कार्यशाळेला पुणे जिल्ह्यातील विविध भागातून सुमारे १८० पदाधिकारी उपस्थित होते, युवकांचा सहभाग उल्लेखनीय होता, सर्वांनी आपल्या भागात संघटन वाढवण्याचे ठरवण्यात आले.

Follow Us On