Team MyPuneCiry – ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसतर्फे मंगळवारी (२१ मे) ‘तिरंगा यात्रा’चे (Tiranga Yatra)आयोजन करण्यात आले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ हॉटेल ते पिंपरी चौक या मार्गावर झालेल्या या यात्रेत (Tiranga Yatra) “जय जवान जय किसान”, “भारत माता की जय”, “सेना हमारी शान है, किसान हमारी जान है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
तिरंगा यात्रा ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असून, पिंपरीतील या यात्रेची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आली. या प्रसंगी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण करत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

या वेळी डॉ. कैलास कदम यांनी भाषणात सांगितले की, “जेव्हा जेव्हा देशावर संकट कोसळले, तेव्हा भारतीय सैन्याने आपल्या प्राणांची आहुती देऊन देशवासीयांचे रक्षण केले आहे. काँग्रेस पक्षाने कायम भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ही तिरंगा यात्रा (Tiranga Yatra) म्हणजे त्या शौर्य आणि बलिदानाची अभिव्यक्ती आहे.”
अजय देवगणचा ‘रेड 2’ 22व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुवांधार, ‘छावा’चे रेकॉर्ड मोडणार?
कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या माजी सैनिक दत्तात्रय कुलकर्णी, मारुती नरहरी बराटे आणि प्रमोद केशव भदने यांचा सन्मान करून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या यात्रेत (Tiranga Yatra) काँग्रेसचे शहर पातळीवरील सर्व विभागप्रमुख, महिला, युवक, अल्पसंख्याक, ओबीसी, शिक्षक सेल व इतर आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी प्रमुखांमध्ये भाऊसाहेब मुगुटमल, अशोक मोरे, बाबू नायर, गौतम आरकडे, अमर नाणेकर, वाहब शेख, मयूर जयस्वाल, अॅड. अनिरुद्ध कांबळे, अबूबकर लांडगे, प्रा. किरण खाजेकर, सोमनाथ शेळके, विश्वनाथ जगताप, निर्मला खैरे, स्वाती शिंदे, वसंत वावरे, बबलू तामचिकर, साजिद खान आदींचा समावेश होता.
तिरंगा यात्रेद्वारे (Tiranga Yatra) केवळ देशभक्तीच नव्हे तर जवानांच्या पराक्रमासाठी समाजात कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करण्यात काँग्रेसने यश मिळवले आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडले. नागरिक व कार्यकर्त्यांनी देशभक्तीचा जोश अनुभवला.






















