Team MyPuneCiry – मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविली जाईल, अशी माहिती मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश आंबेकर (Ankush Ambekar) यांनी दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भरत गरुड, संचालक संतोष कुंभार, सुरेश जाधव, छबुराव गायकवाड, चंद्रकांत दाभाडे, भावना ओव्हाळ, अन्वर शिकिलकर,अमित ओव्हाळ, रमेश सुतार,सहायक गटविकास अधिकारी एस. डी. थोरात, विस्तार अधिकारी मतकरी, संगणक सहायक राऊत, रमेश मानकर आदी उपस्थित होते.
वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक
विश्वकर्मा योजनेबाबत आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, लोणावळा शहर, तळेगाव दाभाडे शहर, वडगाव, कामशेतसह मावळ तालुक्यातील कुशल, पारंपरिक कारागीर आणि छोटे व्यावसायिक यांच्या बैठका घेऊन माहिती देण्यात येणार आहे. यात तालुक्यामधून दोनशे कारागीर, व्यावसायिकांना प्रशिक्षण प्रतिदिन ५०० रुपये मानधन आणि १५ हजार रुपयांचे व्यावसायिक साहित्य, ३ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देणार आहे, असे अंकुश आंबेकर (Ankush Ambekar) यांनी सांगितले.