situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवाणे यांचे बाळ त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द

Published On:

Team MyPuneCity – वैष्णवी हगवाणे (Vaishnavi Hagwane) यांच्या आत्महत्येनंतर बेपत्ता झालेलं त्यांचं १० महिन्यांचं चिमुकलं बाळ अखेर तिच्या आजोबा आनंद कस्पटे यांच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले आहे.

वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून जवळपास दोन वर्षं मानसिक आणि शारीरिक छळ झाला होता. हुंडाबळी, तिच्या चारित्र्यावर संशय घेणं आणि हे बाळ आपलं नसल्याचे आरोप तिच्यावर सातत्याने होत होते. या सततच्या छळामुळे वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या (Vaishnavi Hagwane) केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

झोन २ चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचं बाळ चव्हाण नावाच्या कुटुंबमित्राकडे होतं. जेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी हे बाळ बावधन पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलीस चौकीत सुपूर्द केलं. “बाळ सुरक्षित आहे. आम्ही ते वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं आहे,” असं गायकवाड यांनी सांगितलं.

या प्रकरणावर महाराष्ट्र महिला आयोगानेही एक्स वरून प्रतिक्रिया देत सांगितलं की, “वैष्णवी हगवाणे (Vaishnavi Hagwane) यांचे बाळ आज त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे. हगवाणे कुटुंबातील तिघांना अटक झाली असून दोन आरोपी फरार आहेत. बाळ राजेंद्र हगवाणे यांच्या नात्यातील व्यक्तीकडे होतं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बाळाचं पालकत्व वैष्णवीच्या आईवडिलांना देण्यात येईल.”

मिळालेल्या माहितीनुसार, बाळ शशांक हगवणेचा मावसभाऊ निलेश चव्हाण याच्याकडे होतं. वैष्णवीच्या नवऱ्याला, सासू आणि नणंदेला अटक झाल्यानंतर हे बाळ चव्हाणकडे सोपवण्यात आलं होतं. त्याला या प्रकरणाची पूर्ण कल्पना नव्हती. मात्र सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याने हे बाळ पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सुपूर्द केलं.

आरोपींची पोलिस कोठडी २६ मेपर्यंत

वैष्णवी हगवाणे (Vaishnavi Hagwane) आत्महत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या नवऱ्याला, सासू आणि नणंदेला २६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली. दरम्यान, राजेंद्र हगवाणे (वैष्णवीचे सासरे) आणि सुशील हगवाणे (दिर) हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. राजेंद्र हगवाणे यांच्या राजकीय संबंधांमुळे पोलिसांवर दबाव असल्याचंही काही ठिकाणी म्हटलं जात आहे.

Follow Us On