situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 22 May 2025 : गांजाची शेती करणाऱ्या दोघांना अटक

Published On:
---Advertisement---

दोन कारवायांमध्ये १६ लाख १३ हजारांचा गांजा जप्त (Pimpri Chinchwad Crime News 22 May 2025)

Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने आळंदी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (२१ मे) दोन कारवाया केल्या. गांजाची शेती करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १६ लाख १३ हजार रुपये किमतीची ५५ गांजाची झाडे जप्त केली आहेत.

पहिली कारवाई आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरकळ गावातील बागवान वस्ती येथे करण्यात आली. गंगे माने कामी (५८, बागवान वस्ती, मरकळ, खेड. मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याने शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती. गुन्हे शाखेने कारवाई करत दोन लाख १३ हजार रुपये किमतीची गांजाची १५ झाडे जप्त केली. त्याचे वजन ४.२६० किलो आहे. गंगे माने कामी हा बागवान वस्ती येथील एका शेतामध्ये काम करत होता. शेतकऱ्याच्या परस्पर त्याने शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती.

दुसरी कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरेगाव खुर्द येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये बाळू बबन गाळव (६५, कोरेगाव खुर्द, खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या शेतामध्ये गांजाची ४० झाडे लावली. पोलिसांनी कारवाई करत २८ किलो वजन असलेली १४ लाख रुपये किमतीची झाडे जप्त केली. आरोपीकडे १२५० रुपयांचा २५ ग्रॅम तयार गांजा देखील आढळून आला. पोलिसांनी एकूण १४ लाख १२५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

कारची दुचाकीला धडक, दोनजण गंभीर जखमी (Pimpri Chinchwad Crime News 22 May 2025)

पिंपरी एमआयडीसी मध्ये एका कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (२० मे) दुपारी घडला.

गोविंद गोपाळ शिंदे, उपेंद्र मच्छिंद्रनाथ कदम अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी गोविंद यांचा मुलगा प्रशांत गोविंद शिंदे (२८, नेहरूनगर, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक ध्रुवेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद शिंदे आणि उपेंद्र कदम हे कंपनीच्या कामानिमित्त कदम यांच्या दुचाकीवरून जात होते. पिंपरी एमआयडीसी मधील प्रॉम्प्ट इंजीनियरिंग कंपनीच्या चौकात कदम यांच्या दुचाकीला एका कारने धडक दिली. या अपघातात गोविंद शिंदे आणि उपेंद्र कदम हे गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू (Pimpri Chinchwad Crime News 22 May 2025)

खेड तालुक्यातील वाकी येथे भाम नदीच्या पुलावर एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (२१ मे) दुपारी घडला.

राहुल पोपट कड (३९) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयूर शिवाजी कड (२३, वाकी खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक दुर्गाप्रसाद रामजी विश्वकर्मा (४२, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर यांचे चुलते राहुल कड हे चाकण येथून आपल्या गावी वाकी येथे दुचाकीवरून जात होते. भाम नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात राहुल कड यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On