situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: सायबर पोलिसांचा चार दिवसात ४००० किलोमीटर प्रवास, सायबर फसवणूक करणाऱ्या चौघांना धाराशिव, लातूर, जयपूर मधून अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –पिंपरी-चिंचवड मधील एका व्यक्तीची ७१ लाखांची फसवणूक करणाऱ्या चार जणांना सायबर पोलिसांनी धाराशिव, लातूर आणि राजस्थान राज्यातील जयपूर येथून अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी चार दिवस तब्बल चार हजार किलोमीटर प्रवास केला.

अलफहाद आरिफ मोमिण (२७, धाराशिव), अजय पाटील ऊर्फ शिवप्रसाद मलिकार्जुन खुदासे (३९, लातुर),  सुर्या ऊर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत (झुंझुनू, राजस्थान), प्रेमशंकर बलदेव बैरागी (मिलवाडा, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करुन त्यांना smc global securities या कंपनीचे aurora max या बनावट शेअर मार्केट ट्रेडींग अॅपद्वारे गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी त्यांना एक अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावरून शेअर ट्रेडिंग करीता वेगवेगळे बँक अकाऊंट देऊन त्यावर एकूण ७१ लाख रुपये गुंतवणुक करण्यास सांगत त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali: चिखलीतील ३६ बंगल्यांच्या तोडफोडीमागे ‘झोनिंग’ माहितीचा अभाव; ‘Right to Purchase’ कायद्याची मागणी

गुन्हयाचा तपास करत असताना फिर्यादी यांनी वेगवेगळ्या बँक अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले असल्याने त्या अकाऊंटचा तपास करण्यात आला. त्यातून आरोपी निष्पन्न करून अलफहाद याला धाराशिव आणि अजय पाटील याला लातूर मधून अटक करण्यात आली. या दोघांचे बँक अकाउंट किट राजस्थान येथील सूर्या आणि प्रेमशंकर यांना दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी राजस्थान येथील जयपूर येथे सापळा लावून या दोघांना अटक केली. शिवप्रसाद हा लोकांना संपर्क साधून त्यांचे बँक खाते सुरु करत असे. त्या खात्यांचे किट, इंटरनेट बँकिंग पासवर्डसह सर्व माहिती सूर्या कर्णावत याला देत असे. सूर्या आणि प्रेमशंकर हे चायनीज, कंबोडिया, दुबई येथील लोकांच्या संपर्कात असून त्यांच्याकडे आलेल्या बँक खात्याची माहिती देत पुढे देत असत.

या गुन्हयात सायबर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस उपनिरीक्षक विदया पाटील यांनी प्रथम धाराशिव जिल्हयातील अंकाउटधारकास ५०० किमी प्रवास करुन ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा पिंपरी ते लातुर असा ८०० किमी प्रवास करुन आरोपी शिवप्रसाद यास ताब्यात घेतले. तसेच पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण व स्टाफ यांनी जयपुर राजस्थान याठिकाणी जाऊन आरोपी सूर्या आणि प्रेमशंकर यांना ताब्यात घेतले. आरोपी एकमेकांशी व्हाट्स अपच्या माध्यमातून संपर्क करत होते. आरोपी वापरत असलेल्या बँक खात्यात दोन दिवसात तब्बल ३.२५ कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, विदया पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात दिपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिच्चेवार, प्रितम भालेराव, अभिजित उकिरडे, विशाल निचित, सुभाष पाटील, निलेश देशमुख, दिपाली चव्हाण, शुंभागी ढोबळे यांनी केली.

Follow Us On