Team MyPuneCity –गेला आठवडाभर पडत असलेल्या अवकाळी पावसाने मावळ तालुक्याच्या काही भागात धुमाकूळ घातला असून या पावसाने लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडत आहे. या पावसामुळे काही मंगल कार्यालयाच्या दारात डीजेवर ताल धरून नाचणाऱ्या तरुणाईवर तसेच लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर काढण्यात येणाऱ्या वरातीवर मोठे संकट आले आहे.
सध्या मावळ तालुक्यात लग्नाचा मोसम जोरात सुरू असून शहरी भागाच्या जवळ असलेल्या मंगल कार्यालयामध्ये मावळ तालुक्यातील विविध भागातून लग्न सोहळे साजरे केले जात आहेत. या लग्न सोहळ्यावर पावसाचे सावट पडत असल्याने तरुणाईच्या आनंदावर आणि लग्न सोहळ्यातील कुटुंबांवर एक प्रकारची झालरच आली आहे. तालुक्याच्या विविध भागात दुपारनंतर अवकाळी पाऊस अचानकपणे येत असल्यामुळे मंगल कार्यालयाच्या जवळ आणि गार्डन लॉन्सवर होत असलेले लग्नसोहळे या पावसाने रद्द करून छोट्या हॉलमध्ये घ्यावे लागत आहेत. तसेच जेवणासाठी केलेला बडेजाव यालाही यामुळे अडथळा निर्माण झालेला आहे.
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन
सायंकाळी नियमितपणे होणारी लग्ने आणि त्याच सुमारास अचानक येत असलेला पाऊस यामुळे तर लग्न सोहळ्यासाठी आलेल्या व-हाडी बांधवांची प्रचंड तारांबळ होत आहे. डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई तसेच वराती या पावसामुळे अडचणीत आलेले आहेत पाऊस आणि वराती यामुळे लग्न सोहळ्यात अडचण वाटत आहे.
सायंकाळी विद्युत रोषणाईत गार्डन मंगल कार्यालयामध्ये होणारे लग्न सोहळे पावसामुळे त्याची ठिकाणे बदलण्याची वेळ आलेली आहे. लग्नाची वेळ देखील पाळली जात नाही. तसेच येणाऱ्या अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्याच्या उपस्थितीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे लग्न सोहळा झाल्यानंतर दोन-तीन दिवसात होणारी महापूजा जागरण गोंधळ हे कार्यक्रमसुद्धा बंदिस्त जागी घ्यावे लागत आहे. त्यामुळे एकूणच या आठवड्यातल्या अवकाळी पावसाच्या या ऐनवेळी येण्यामुळे लग्न सोहळे समारंभावर एक प्रकारचे सावट पसरले आहे.
या लग्नसोळ्यामध्ये वधू वराच्या दोन्ही पक्षातील वर बापांना मंगल कार्यालयाचे भाडे,संपूर्ण जेवणावळीचा खर्च,डीजे,डॉल्बी, वाजंत्री यांना देण्यात येणारे मानधन, फटाके, विद्युत रोषणाई,पेपर ब्लास्ट या सर्वांची ठरलेली मोठी रक्कम सूट न मिळता चुकती करावी लागते. एकीकडे आनंदावर आलेले विरजण आणि दुसरीकडे लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर वाया गेलेल्या खर्चाचे शल्य वधू-वरांच्या पित्यांना आयुष्यभर टोचत राहील.
“अवकाळी पावसामुळे नव – दांपत्याची उत्सुकता शिगेला पोचलेली असताना पावसाने त्यांना निराशेच्या गर्तेत ढकलले आहे. त्यामुळे अनेक दिवस मिलनाची वाट पाहणाऱ्या नववधूंवर निराशेचे ढग या पावसामुळे आले आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदाचे आणि उत्साहाचे स्वप्न भंग पावते की काय? अशी स्थिती त्यां नववधूंची पहायला. मिळते आहे“