situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 20 May 2025 : भांडणात मध्यस्थी करणा-यास चौघांकडून मारहाण

Published On:

Team MyPuneCity –भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीसह चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. भांडण सोडवणाऱ्या व्यक्तीच्या कारची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. ही घटना सोमवारी (19 मे) दुपारी खेड तालुक्यातील पडवळ वस्ती येथील तुळजाभवानी हॉटेलमध्ये घडली.

बंडू पडवळ, प्रणव पडवळ (दोघे रा. शेलू, ता. खेड), अजिंक्य चोरगे (रा. पाईट, ता. खेड), त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामदास घावटे (22, शेलू, खेड) असे जखमीचे नाव असून त्यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घावटे हे जेसीबी ड्रायव्हरचा जेवणाचा डबा घेण्यासाठी तुळजा भवानी हॉटेलमध्ये गेले होते. तिथे घावटे यांचे मित्र तेजस लिंबोरे व आरोपी यांच्यात भांडण सुरू होते. घावटे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पाईप व लाथाबुक्यांनी घावटे यांना मारहाण केली. तेजस लिंबोरे तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले हॉटेल मधील दोन कामगार यांना देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केले. घावटे यांच्या कारची काच फोडून बोनेटवर दगड मारून नुकसान केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन


भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (19 मे) मध्यरात्री बालेवाडी मेट्रो ब्रिजजवळ घडली.

जावेद नजीर मुजावर (कुदळवाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. धनराज मेहरसिंग बीके (54, बालेवाडी, मुळगाव नेपाळ) यांनी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जलधरदेवी बीके असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनराज बीके, त्यांची पत्नी जलधरदेवी  आणि नातू पराग असे बालेवाडी स्टेडियम जवळ रस्त्याच्या बाजूला रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने जलधरदेवी यांना जोरात धडक दिली. यामध्ये जलधरदेवी बीके यांचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.


दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला एका दुचाकीने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (18 मे) रात्री 10.30 वाजताच्य सुमारास मारूंजी येथील सेव्हन स्टार लेन येथे घडली.

चंद्रकांत अर्जुन पावरी (५३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत यांची मुलगी विशाखा चंद्रकांत पावरी (२३, मारुंजी. मूळ रा. रत्नागिरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच 12/टीएल 0912) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी विशाखा पावरी, त्यांचे वडील चंद्रकांत पावरी आणि काका नरेंद्र बेंदरकर हे तिघेजण शतपावली करण्यासाठी पायी चालत जात होते. सेवन स्टार लेन, मारुंजी येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीने चंद्रकांत पावरी यांना जोरात धडक दिली. या अपघातात पावरी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर आरोपी दुचाकी चालक त्याची दुचाकी अपघाताच्या ठिकाणी सोडून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On