Team MyPuneCity – कोंढवा परिसरात (Pune)भरधाव वेगाने वाहन चालवून १३ वर्षीय (Pune)अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, संबंधित आरोपी वाहनचालकास कोंढवा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
ही घटना दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी कोंढवा बु. गावठाण येथील भोलेनाथ चौकात घडली. जैद नसिर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, ग.न. ३१, बसेरा अपार्टमेंट, कोंढवा खुर्द, पुणे) हा त्याच्या मित्रांसोबत इनोव्हा कारमधून जात असताना, अरुंद रस्त्यावर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने गाडी चालवत होता. यावेळी रस्त्याच्या कडेला जात असलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याने जोरदार धडक दिली.
Dr. Jayant Naralikar Passed Away : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
धडक एवढी भीषण होती की, अपघातग्रस्त मुलगा रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीच्या गेटमध्ये अडकला. धडकेमुळे गेट तुटून कार थेट इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसली. गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी चालक जैद शेख यास ताब्यात घेतले. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात करीत आहेत. सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे विभागाचे निरीक्षक रौफ शेख व नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि पोलीस अंमलदार जितू गायकवाड यांनी केली.