situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 19 May 2025 : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकास अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे कारवाई करत एकास अटक केली. ही कारवाई रविवारी (18 मे) दुपारी करण्यात आली.

सुहास काशिनाथ पाडळे (44, म्हाळुंगे गाव, मुळशी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर राणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे गाव येथे शितळादेवी रोडवर एक व्यक्ती दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सुहास पाडळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ हजार 400 रुपये किमतीची 84 लिटर गावठी दारू जप्त केली आहे.


सावरदरी गावात चार लाखांची चोरी

खेड तालुक्यातील सावरदरी गावात एका चोरट्याने घरात चार लाखांची चोरी केली. ही घटना रविवारी (18 मे) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

विजय अनुरथ कदम (पेडगाव रोड, परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दिगंबर लिंबाजी पोले (40, सावरदरी खेड. मूळ रा. परभणी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते सावरदरी येथे राहत होते. रविवारी सायंकाळी विजय कदम हा दिगंबर पोले यांच्या घरात आला. त्याने घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले तीन लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 50 हजार रुपये किमतीची अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण चार लाखांचा ऐवज चोरून नेला.


अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 14 मे रोजी घडला.

हरिश्चंद्र महादू भोर (70, मोशी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी 18 मे रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोर हे 14 मे रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. मोशी येथील भारत माता चौकातील सिग्नल वरून पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने भोर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात भोर यांच्या मणक्याला, बरगडीला, हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला.


दारू पिऊन पत्नीला मारहाण: पतीला अटक

पतीने दारू पिऊन पत्नीला मारहाण केली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (17 मे) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पीसीएस चौक, चऱ्होली खुर्द येथे घडली.

गणेश मुंजाजी केंद्रे (चऱ्होली खुर्द) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी गणेश केंद्रे याने त्याच्या पत्नीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. त्यामुळे पत्नीने तिच्या आईला बोलावून पती बद्दल तक्रार केली. पत्नीच्या आईने दोघांची समजूत घालून भांडण मिटवले. त्यानंतर गणेश केंद्रे घराबाहेर गेला आणि दारू पिऊन आला. दारू पिऊन आलेल्या गणेश याने पत्नीसोबत पुन्हा वाद करून तिला शिवीगाळ करत पाईपने बेदम मारहाण केली. पोलिसांनी गणेश केंद्रे याला अटक केली आहे.


गुंतवणुकीच्या बहाण्याने 39.83 लाखांची फसवणूक

एफएक्स रोड ट्रेडिंग या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून दिघी येथील एका व्यक्तीची 39 लाख 83 हजार 730 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 26 फेब्रुवारी ते दोन मे या कालावधीत दिघी येथे ऑनलाईन माध्यमातून घडला.

याप्रकरणी 63 वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एफएक्स रोड ट्रेडिंग हे एप्लीकेशन चालवणारे चालक, टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन, कॉलवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्तीने एफएक्स रोड ट्रेडिंग कंपनीचे एप्लीकेशन फेसबुक लिंक वरून डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकांचा आणि इतर व्यक्तींचा फोन आला. फोनवरील व्यक्तींनी कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन केले. फिर्यादी यांचे ट्रेडिंग अकाउंट सुरू करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडले. पैसे गुंतवणूक केल्यानंतर ते पैसे वाढत असल्याचे त्या एप्लीकेशन मध्ये दाखविण्यात आले. काही कालावधीनंतर फिर्यादी यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे काढून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर एका महिलेने फिर्यादीस फोन करून आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी एकूण 39 लाख 83 हजार 730 रुपये भरले. मात्र आरोपींनी त्यांना कोणताही मोबदला अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On