situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Disaster Management Camp : मुळशीमध्ये सलग ३६ तासांचे आपत्ती व्यवस्थापन शिबिर यशस्वीपणे पार

Updated On:
Disaster Management Camp
---Advertisement---

273 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग; तिकोना किल्ला, हाडशी डॅम परिसरात विविध प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे

Team MyPuneCity – मुळशी तालुक्यातील काशिग (ता. मुळशी, जि. पुणे) येथील खंडोबा मंदिर परिसर, तिकोना किल्ला आणि हाडशी डॅम क्र. १ परिसरात सलग ३६ तासांचे निवासी आपत्ती व्यवस्थापन शिबिर (Disaster Management Camp) शनिवारी १७ मे व रविवारी १८ मे या कालावधीत उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण २७३ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शनिवारी सकाळी शिबिराचा (Disaster Management Camp) औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर विविध प्रशिक्षण सत्रांद्वारे आपत्ती व्यवस्थापनासंबंधी प्रत्यक्ष ज्ञान देण्यात आले. प्रथमोपचार, रस्ते अपघातग्रस्तांना मदत, साप ओळख व उपचार, आग नियंत्रण (घर, वाहन, कंपनी, इमारत), वनवा नियंत्रण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

शनिवारी रात्रीच्या सत्रात मुळशीचा ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळांची माहिती आणि टेलिस्कोपद्वारे आकाशदर्शन याचे आयोजन करण्यात आले. दरडी कोसळण्याची पूर्वसूचना व बचाव या विषयावरही माहिती देण्यात आली.

रविवारी सकाळी तिकोना किल्ल्याची ट्रेकिंग मोहिम, रॉक क्लायम्बिंग, गडावरील अपघातांपासून बचाव, तसेच गड उतरतानाची काळजी यावर प्रशिक्षण (Disaster Management Camp) झाले. त्यानंतर हाडशी तलावात बोटिंगसह पाण्यातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या मार्गदर्शक समितीमध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी, मुळशी तहसीलदार आणि भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचा समावेश होता.

शिबिरात (Disaster Management Camp) डोनेट एड सोसायटी, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, सेंटर फॉर सिटिझन सायन्स, मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशन, वन्यजीव रक्षक संस्था, सह्याद्री सर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू फोर्स, महाराष्ट्र सिव्हिल फोर्स, गिरिवन ग्रुप, अनंतराव पवार महाविद्यालय आदी संस्थांचा सक्रिय सहभाग होता.

मुळशी आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी शिबिरासंबंधीची माहिती दिली. या शिबिरासाठी योगदान दिलेल्या सर्व व्यक्ती व संस्थांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Follow Us On