situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला लुटणारा आरोपी १२ तासांत गजाआड; सहकारनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Published On:

Team MyPuneCity –मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात सहकारनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. अमोल किसन नाकते (वय २७, सध्या रा. समता कॉलनी, प्रेरणा शाळेमागे, गणेश चौकाजवळ, आंबेगाव पठार, मूळ रा. मु. पिंपरी, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दि. १६ मे २०२५ रोजी सकाळी हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिराजवळील सार्वजनिक रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून गुन्हा करणारा इसम ‘स्विगी’ डिलिव्हरी बॉय असल्याचे निष्पन्न झाले.

Chinchwad: पालिकेकडील परवानगीचा कागद पूर थांबवू शकणार नाही- राजेंद्र सिंह

पोलिस अमलदार सागर सुतकर व योगेश ढोले यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गणेश चौक, आंबेगाव पठार येथे सापळा रचून संशयित अमोल नाकतेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरण्यात आलेले दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र (सुमारे ₹९०,०००), गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (₹६०,०००) व चोरीचे सोनं गहाण ठेवून मिळवलेली ₹१,००,००० रोकड असा एकूण ₹२.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

न्यायालयाने आरोपी अमोल नाकते याला २० मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सुरेखा चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक फौजदार बापू खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदीप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश कितींकर, खंडू शिंदे, अमित पदमाळे व मारोती नलवाड यांचा समावेश होता.

Follow Us On