Team MyPuneCity – कॅम्प परिसरात पादचाऱ्यांना दुचाकीवरून ( Pune Crime News ) पाठलाग करत लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत लष्कर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून, त्यांच्या टोळीत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकाचाही सहभाग उघड झाला आहे. अटकेतील आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली नंबर प्लेट नसलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
याप्रकरणी सय्यद मोबीन खान (वय २६) रा. पुणे यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. १५ मे रोजी रात्री साचापीर स्ट्रीटमधील सीटिशन ट्रेडिंग बँकेजवळून पायी चालत जात असताना, दोन अज्ञात तरुणांनी अॅक्टिव्हा दुचाकीवरून येत त्यांना ढकलले व त्यांच्याकडील मोबाईल फोन हिसकावून चोरून नेला होता. या तक्रारीवरून लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला होता.
Rashi Bhavishya 18 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा भवानी पेठेतील अनिकेत आरणे व आयान पठाण यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आणि भवानी पेठेत सापळा रचत संशयितांचा शोध घेतला. या दरम्यान, नंबर नसलेल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे आयान फिरदोस पठाण (वय १८, रा. गोल्डन हाईट्स, भवानी पेठ), अनिकेत दामु आरणे (वय २०, रा. अण्णा भाऊ साठे वसाहत, भवानी पेठ) अशी सांगितली. त्यांच्या सोबत असलेला एक अल्पवयीन मुलगा देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरी गेलेला मोबाईल व दुचाकी जप्त (Pune Crime News) केली आहे.
तपासात या टोळीने लष्कर आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पादचाऱ्यांना लुटण्याचे आणखी प्रकार केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, संदीप उकिरडे, सोमनाथ बनसोडे, सचिन मांजरे, रमेश चौधरी, सागर हराळ, लोकेश कदम व अमोल कोडिलकर यांचा समावेश होता. पोलिसांकडून पुढील तपास सुरू( Pune Crime News ) आहे.