Team MyPuneCity – एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या (SPG International Public School) विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे १२ वीच्या परिक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून शाळेच्या नावलौकीकामध्ये भर टाकली आहे.
यंदाच्या १२ वीच्या परिक्षेमध्ये सिद्धेश मांडे (९६.८%), श्रीयान राव (९५%) काव्या टिकाले (९४.६%) , अथर्व साळुंखे (९२.६%) ,अश्मित कुमार सिंह (९२.२%) या मुलांनी बाजी मारली आहे.
या घवघवीत यशात विद्यार्थ्यांसोबत शाळेचे शिक्षक वर्ग तसेच मुख्याध्यापक यांचा देखील मोलाचा वाटा आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे सर्वांकडून अभिनंदन (SPG International Public School) होत आहे.