Team MyPuneCity – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना तिकीट वितरण जलदगतीने व सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि सुट्ट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये होणारे वाद-विवाद टाळण्याकरीता मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन तिकीट वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
PCMC : पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगल्यांविरोधात महापालिकेची मोठी कारवाई
पंरतु प्रवाशी नागरिक ऑनलाईन तिकीट घेतांना बसलेल्या ठिकाणा पासुन तिकीट घेत नसल्याचे पर्यवेक्षकीय सेवक व तिकीट तपासणीस यांच्या निर्देशनास आलेले आहे.
तरी प्रवाशांनी बसलेल्या बस थांब्यावरून त्वरीत तिकीट घेणे अनिवार्य असून ऑनलाईन तिकीट घेताना नेटवर्कमुळे तिकीट वितरीत होण्यास विलंब होत असल्यास वाहकाकडून ई-मशीनद्वारे रोखीने तिकीट घेणेचे करावे. परंतु जे प्रवाशी नागरिक तिकीट वेळेत घेणार नाहीत त्यांच्या वर परिवहन महामंडळाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
पीएमपीएमएलकडून प्रवाशांना आवाहन
प्रवाशांनी बसलेल्या बस थांब्यावरूनच तिकीट घ्यावे.
ऑनलाईन तिकीट घेताना नेटवर्कमुळे तिकीट वितरीत होण्यास विलंब होत असल्यास प्रवाशी
नागरिकांनी वाहकांकडून ई-मशीनद्वारे रोखीने तिकीट घ्यावे.
प्रवाशांनी तिकीट वेळेत न घेतल्यास होणार दंडात्मक कारवाई.