situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 17 May 2025 : सिटिझन ट्रेडिंग बँकेजवळ इसमाच्या मोबाईलची जबरी चोरी

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीट येथील सिटिझन ट्रेडिंग बँकेजवळ एका इसमाच्या हातातील मोबाईलची ( Pune Crime News 17 May 2025) जबरी चोरी करण्यात आली. ही घटना १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.

भवानी पेठ, पुणे येथील ५४ वर्षीय इसम हे साचापीर स्ट्रीटमधील जांभळाच्या झाडाखाली उभे असताना, मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येत त्यांच्या हातातील १५,००० रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे करीत आहेत.


सोने परत न करता फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा ( Pune Crime News 17 May 2025)

पुणे – मोमिन गोल्ड स्मिथ, दारुवाला पूल येथे एका व्यक्तीकडून ताळे मणी गोफण्यासाठी सोने दिल्यानंतर ते परत न करता विश्वासघात करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दारुवाला पूल, पुणे येथे राहणारे मोनिन मुल्ला (३६ वर्षे) यांनी फिर्याद दिली असून, ४ ते ८ एप्रिल २०२५ दरम्यान त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी अर्धवट गंठणाचे सोने एका इसमाकडे गोफण्यासाठी दिले होते. मात्र, संबंधित इसमाने ते परत न करता विश्वासघात करत फसवणूक केली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.


औंधमध्ये बंद घरातून ११ लाखांचे दागिने चोरीला ( Pune Crime News 17 May 2025)

पुणे – औंध येथील केसरी रोडवरील विनोद अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १० ते १३ मे २०२५ या कालावधीत घडली.

३८ वर्षीय महिला फिर्यादी यांनी केसरी रोड, औंध येथील त्यांच्या राहत्या फ्लॅटला कुलूप लावून ते काही दिवसांसाठी बंद ठेवले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने चोरले.

या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.


कॅम्प परिसरात ६० वर्षीय इसमाच्या खिशातील पॉकेट जबरदस्तीने हिसकावले ( Pune Crime News 17 May 2025)

पुणे – वानवडीगाव येथील ६० वर्षीय इसम कॅम्प परिसरातील शरबतवाला चौकाजवळून जात असताना, मोटारसायकलवर आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येऊन खिशातील पॉकेट जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली. ही घटना १० मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता घडली.

फिर्यादी हे पायी चालत असताना, आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील पॉकेट हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव करत आहेत.

Follow Us On