situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri -Chichwad Crime News 17 May 202 : मोशी येथे पैशाच्या वादातून खून; पाच आरोपींना अटक

Published On:
Pune Crime News 10 June 202
---Advertisement---

Team MyPuneCity – मोशी-देहू रोड येथे एका महिलेच्या पतीवर लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. हा प्रकार १६ मे २०२५ रोजी पहाटे साडेदोन वाजण्याच्या सुमारास घडला ( Pimpri Chichwad Crime News 17 May 2025 )असून या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने (वय ३५) दिलेल्या माहितीवरून अशोक पंडित म्हाळसकर (३२, चिंबळी चौक, चिंबळी), रोहन पंडित म्हाळसकर (२२, चिंबळी चौक, चिंबळी), प्रसाद पंडित म्हाळसकर (२५, चिंबळी चौक, चिंबळी), संकेत हिरामण जैद (२७, जैदवस्ती, चिंबळी), अमर अंकुश निळे (२५, चिंबळी चौक, चिंबळी) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीच्या पती ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव बर्गे (वय ३९) यांच्याशी आरोपींचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता. त्यातून त्यांनी संगनमत करून लोखंडी कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात बर्गे यांचा मृत्यू झाला. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वॉचमनला देखील “तू मध्ये आलास तर तुलाही मारून टाकीन” अशी धमकी देण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठारे करत आहेत.


ऑनलाईन फसवणूक; शेगांव येथील दर्शनाच्या नावाखाली तब्बल साडेसात लाखांची लूट( Pimpri Chichwad Crime News 17 May 2025 )

भक्तनिवासात एसी रूम बुक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून तब्बल ₹७,२२,००० ची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार २७ ते २९ एप्रिलदरम्यान घडला असून, १६ मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहूल अशोकराव पाठक (वय ४१, रा. लेखा फार्मजवळ, देहूरोड) यांनी त्यांच्या कुटुंबासह गजानन महाराज शेगाव येथे दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी इंटरनेटवरील एका वेबसाइटवरून “सतिश शर्मा” नावाच्या व्यक्तीशी संपर्क केला. त्या व्यक्तीने भक्तनिवासात रूम बुक करण्याच्या कारणास्तव वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि QR कोड स्कॅन करून पैसे पाठवण्यास सांगितले.

पाठक यांनी एकूण ₹७,२२,००० रुपये पाठवले. मात्र नंतर तो व्यक्ती गायब झाला व पैसे परत मिळाले नाहीत.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वाकसे करत आहेत.


भरधाव अज्ञात वाहनाची धडक; वडिलांचा मृत्यू, आई जखमी ( Pimpri Chichwad Crime News 17 May 2025 )

चाकण – वावडमळा, मका कंपनी जवळ आंबेठाण रोड येथे भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने एका कुटुंबाला धडक दिली. या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली. हा प्रकार १५ मे रोजी सकाळी ८ वाजता घडला असून १६ मे रोजी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सतीश जयराम चव्हाण (वय २२, वावडमळा, चाकण) यांच्या सांगण्यानुसार, त्यांचे वडील जयराम तारासिंग चव्हाण (वय ५२), आई शिलाबाई आणि एक ओळखीची महिला हे पायी चालत असताना भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला असून आईसह इतरांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भवारी करत आहेत.


निष्काळजी दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक; दुचाकीस्वार जखमी ( Pimpri Chichwad Crime News 17 May 2025 )

पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी गावच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार स्वतः जखमी झाला असून रिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले आहे. ही घटना १५ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.

अभिषेक मोंढे (वय २४, रा. बालाजी नगर, मोंढेकरवाडी, हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोरंजन कुमार सिंग या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे आणि वेगात दुचाकी चालवत असताना रिक्षाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पानसरे करत आहेत.


दापोडीत किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला; एकावर गंभीर वार“( Pimpri Chichwad Crime News 17 May 2025 )

दापोडी परिसरात एका मोडकळीस आलेल्या जागेवर वाद होऊन एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करण्यात आला आहे. हा प्रकार १५ मेच्या रात्री १० ते १६ मेच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडला असून दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज वासु शिंदे (वय ३८, रा. महात्मा फुले नगर, दापोडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अख्तर अकबर खान (वय ५५, रा. किनारा हॉटेल जवळ, दापोडी) याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. किरकोळ वादातून हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या गंभीर हल्ल्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करत आहेत.

Follow Us On