Team MyPuneCity – डाॅ. डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या वतीने आयोजित भारतीय नृत्य शैली वर आधारित आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद नुकतीच डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ मेडिकल कॉलेज ऑडिटोरियम येथे उत्साहात ( Pimpri) संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
यावेळी रंगमंचावर प्रमुख पाहुण्या डॉक्टर संध्या पुरेचा ,अध्यक्षा संगीत नाटक अकादमी , सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली, डॉ भाग्यश्री ताई पाटील ,प्र कुलगुरू, डाॅ.डी.वाय. पाटील विद्यापीठ, डॉक्टर रेखा डीन मेडिकल कॉलेज ,डॉ वत्सला स्वामी संचालक ,आयक्यू एसी, भावना शाह,सचिव,भरता कॉलेज, मुंबई व डॉक्टर नंदकिशोर कपोते संचालक, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी डॉक्टर नंदकिशोर कपोते यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉक्टर संध्या पुरेचा यांचा पुष्पगुच्छ व शाल स्मृतिचिन्ह देऊन डॉ भाग्यश्री ताई पाटील यांनी सत्कार केला. डॉक्टर संध्या पुरेचा यांनी भरतनाट्यम नृत्या विषयी अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले.
Pimpri-Chinchwad: आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार – शत्रुघ्न (बापू) काटे
डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या शिष्या व भरता कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कल्चर,मुंबई च्या विद्यार्थिनींनी सुंदर भरतनाट्यम नृत्य सादर केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या खेळ मांडीयेला आणि विठू नामाचा गजर या नृत्यांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ( Pimpri) त्यांनी तिल्लाना सादर केला.

डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी व डॉक्टर नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी कथक नृत्य सादर केले . गुरु स्वाती दैठणकर यांच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम नृत्य तर निकिता मोघे यांच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केले .
सर्व कार्यक्रमास रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रतिमा चव्हाण यांनी केले यानंतर अपर्णा पानसे ,नेहा जोशी, शिल्प अंतापुरकर, प्रतिमा चव्हाण, अनुष्का सामंत , भावना सामंत यांनी विविध नृत्य विषयांवर शोध निबंध प्रस्तुत केला. रसिकांच्या प्रचंड प्रतिसादाने संपूर्ण कार्यक्रम ( Pimpri) अविस्मरणीय झाला.