Team MyPuneCity – लोहगाव येथील निंबाळकर नगर परिसरात बंद घर फोडून चोरट्याने सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज ( Pune Crime News 16 May 2025) लंपास केल्याची घटना १३ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० ते रात्री ८.३० या वेळेत घडली. याप्रकरणी लोहगाव येथील ४० वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी त्यांचे राहते घर कुलूप लावून बंद केले होते. चोरट्याने बाहेरील चप्पल स्टँडमध्ये ठेवलेल्या बुटामधून घराची चावी मिळवली व दरवाजावरील लॉक उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील कपाटातून ४० हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,७९,२४० रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.
एरंडवणेतील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत सुरक्षा रक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला ( Pune Crime News 16 May 2025)
पुणे – एरंडवणे येथील एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसमोर सुरक्षा रक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेशनगर येथील २२ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. अर्थव गणेश चव्हाण असे आरोपीचे नाव असून कोथरुडमधील ३० वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादीवरून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १५ मे २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सुमा रेस्कॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रा. लि. समोर घडली. याठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक अशोक पोटे यांच्यावर आरोपीने अज्ञात कारणावरून लोखंडी रॉडने डोक्यावर मारून जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित करत आहेत.
पीएमपी बसमधून १.७५ लाखांची सोन्याची बांगडी चोरीला ( Pune Crime News 16 May 2025)
पीएमपीएमएल बसमधून प्रवास करताना एका वृद्ध महिलेच्या हातातील १.७५ लाख रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेल्याची घटना २७ मार्च २०२५ रोजी घडली. या प्रकरणी लोहगाव येथील ६८ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी या नारायणपूर – सासवड – हडपसर – विश्रांतवाडी या मार्गावर पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली. घटनेनंतर त्यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक पाडेकर करत आहेत.
बिबवेवाडीत कौटुंबिक वादातून कु-हाडीने हल्ला; पती गंभीर जखमी ( Pune Crime News 16 May 2025)
बिबवेवाडीतील पापळ वाडा भागात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर कु-हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना १४ मे २०२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे पती घरी जेवत असताना त्यांचा नातेवाईक असलेल्या आरोपीने घराबाहेर आरडाओरड करत शिवीगाळ केली. त्यावर फिर्यादी यांच्या पतीने विचारणा केली असता आरोपीने “तुला आज दाखवतोच” असे म्हणत कु-हाडीने त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर आणि डोळ्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव करत आहेत.
बाणेरमध्ये घरकामगार व वॉचमनने ४.५२ लाखांचे दागिने लंपास केले ( Pune Crime News 16 May 2025)
पुणे – बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोडवरील एका सदनिकेत घरकाम करणाऱ्या महिला व तिच्या वॉचमन पतीने घरातील दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा ५ मे ते १० मे २०२५ या कालावधीत घडला.
फिर्यादी यांच्या अनुपस्थितीत घरकामगार व वॉचमनने त्यांच्या नजर चुकवून ४,५२,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राहीगुडे करत आहेत.