situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : वाघोलीत लॅपटॉप आणि मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Published On:
Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – वाघोली परिसरात घरफोडी करून लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश राममुर्ती बोयर (वय २५ वर्षे, रा. तमिळनाडू) असे अटक ( Crime News) केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले ३ लॅपटॉप आणि ७ मोबाईल फोन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

SPG International Public School : एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळविले घवघवीत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२५ रोजी वाघोलीतील रॉयल पार्क भागातून दोन लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन चोरीला गेले होते (गु.र.नं. १८५/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ)). यानंतर, ३ मे २०२५ रोजी गुलमोहर सिटी परिसरातून आणखी एक मोबाईल फोन चोरीला गेला होता (गु.र.नं. १८७/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ)). दोन्ही गुन्ह्यांची नोंद वाघोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती आणि पोलीस या प्रकरणांचा तपास करत होते.

तपासादरम्यान, पोलीस अंमलदार दिपक कोकरे आणि पांडुरंग माने यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तसेच, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांनी आरोपी सुरेश बोयरची ओळख पटवली. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरी केलेले बहुतांश लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात यश ( Crime News) मिळवले.

Vadgaon Accident : पोलिस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक

ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल आणि पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, बाबासाहेब मोराळे, समीर माटे, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, समीर भोरडे, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके आणि शिवाजी चव्हाण यांच्या टीमने ही कारवाई केली.

आरोपी सुरेश बोयर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असून पुढील तपास सुरू ( Crime News) आहे.

Follow Us On