Team MyPuneCity – आळंदी येथे देहू फाट्याजवळील (Alandi ) काळे कॉलनीसमोर गुरुवारी वाहतूक विभागाने दुचाकीवर कारवाई केली असता त्या दुचाकीचा मालक टोईंग व्हॅन समोरच रस्त्यावर झोपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
देहू फाट्याजवळील काळे कॉलनीसमोर गुरुवारी वाहतूक विभागाने एका व्यक्तीच्या दुचाकीवर कारवाई करत ती टोईंग व्हॅनमध्ये ठेवली . व्यक्तीच्या दुचाकीवर कारवाई केल्याने तो दुचाकी मिळवण्यासाठी चक्क टोईंग व्हॅन समोर झोपला होता व वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन पुढे जाऊ देत नव्हता. शेवटी पोलिसांनी सदर दुचाकी मालकाला बाजूला केले. त्याची समजूत काढून दंड भरून घेतला. त्यांनंतर त्याची मोटरसायकल त्याच्या ताब्यात दिली.
PCCOER : महाराष्ट्र-दिनानिमित्त पीसीसीओईआरमध्ये ६५ पेटंट्स नोंदणी
वाहतूक विभागाची अधिसूचना न देताच कारवाई : नागरिकांचे आरोप
देहू फाटा परिसरात अवैध पार्किंग केलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने टोईंग वाहनात उचलून जप्त केली जात आहेत. मात्र वाहने पार्किंग करण्यासाठी संबंधित विभागाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली नाही किंवा सम विषम तारखेचे फलक बसविले नसल्याने शहरात वाहने पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Maval Crime News : बांधकाम करू नका म्हटल्याने तिघांना मारहाण
सदर इसमाची मोटरसायकल नो पार्किंगमध्ये असल्याने टोईंग कारवाई करण्यात आली होती. संबंधित नागरिक दंड भरण्यास तयार नव्हता. त्याने मद्यप्राशन केलेले होते. तो टोईंग गाडी समोर रस्त्यावर झोपला. असे कृत्य केल्यामुळे आपल्यावर होणारी कारवाई टळली जाईल असा त्याचा समज होता. त्या इसमास समजून सांगितल्यानंतर दंड भरून तो मोटरसायकल (Alandi ) घेऊन गेला.
– सतीश नांदुरकर, पोलीस अधिकारी वाहतूक विभाग.