Team MyPuneCity – फिरण्यासाठी रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या दोघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन तीनचाकी रिक्षा आणि एक दुचाकी असा मिळून एकूण तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला विशेष मोहिमेचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, किरण साबळे हे संशयित वाहन चोरांचा शोध घेत होते.
Talegaon Dabhade : दहावीच्या परिक्षेत आदर्श विद्या मंदिर शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
दरम्यान, तपासदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, चेतन राजू जाधव (वय २५, रा. सुरज दर्शन सोसायटी, आंबेगाव पठार) आणि गणेश दत्तात्रय जगदाळे (वय २६, रा. धनकवडी, आंबेगाव पठार) या दोघांनी चोरलेली वाहने आंबेगाव पठार येथील शिव कॉलनीमधील मोकळ्या जागेत लपवली आहेत. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी छापा टाकत आरोपींना ताब्यात घेतले आणि तपासाअंती त्यांच्या ताब्यातून दोन रिक्षा आणि एक दुचाकी असा एकूण सुमारे लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
या कारवाईत खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:
- गुन्हा रजि. नं. 236/2025 – रिक्षा चोरी
- गुन्हा रजि. नं. 238/2025 – दुचाकी चोरी
- गुन्हा रजि. नं. 118/2025 – रिक्षा चोरी
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, सचिन सरपाले, मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू केला आहे.