Team MyPuneCity – जुन्या वादातून एकावर कोयत्याने वार ( Pimple Nilakh Crime News) करून खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास इंगवले चौक, पिंपळे निलख येथे घडली.
कुणाल संभाजी सातकर (वय 25, रा. पिंपळे निलख) यांनी मंगळवारी (दि. 13) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चैतन्य राजु आहिरे (वय 20, रा. विनायक नगर, पिंपळे निलख) आणि अथर्व अनिल शितोळे (वय 18, रा. गणेशनगर, नवी सांवगी) या दोघांना अटक केली आहे. तसेच प्रेम चव्हाण आणि आरोपीच्या इतर आठ अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pimpri Chichwad Crime News 14 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.15 वाजताच्या सुमारास आरोपी इंगवले चौक, पिंपळे निलख येथे आले. फिर्यादी यांच्या परिसरात राहणारा प्रतिक कांबळे याने आरोपी चैतन्य याला शिवीगाळ केल्याच्या रागातून परिसरात राहणा-या इतर मुलांना शिवीगाळ केली. आरोपींनी चेतन ऊर्फ दाद्या धरपळे याच्या डोक्यात कोयत्याने वार करून तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. फिर्यादीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही कोयत्याने वार करीत मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा भाऊ वाचविण्यासाठी आला असता आरोपीनं त्यास शिवीगाळ व दमदाटी केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या परिसरात येऊन दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास ( Pimple Nilakh Crime News)करीत आहेत.
DehuRoad : देहूरोडच्या श्री शिवाजी विद्यालयाचा ८९.१३ टक्के निकाल
परस्पर विरोधी फिर्याद
फिर्यादी महिलेच्या भावावर हल्ला झाल्यानंतर ती मदतीला गेली असता तिलाही कोयत्याने जखमी करण्यात आले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात चेतन धरपळे, कुणाल सातकर, जीवन लोंढे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल आला आहे. सोमवारी रात्री भावावर झालेल्या हल्ल्यात वैभव याच्या डोक्यावर दगड व लाठ्यांनी वार करून गंभीर जखमी करण्यात आले. त्याच्या उजव्या डोळ्यावर, जबड्यावर व कानावर गंभीर फ्रॅक्चर असून उजवा कान पूर्ण तोडण्यात ( Pimple Nilakh Crime News) आला.