situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 14 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 23 June 2025

Team MyPuneCity – गांजा विक्री प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून ६ हजार ३५० रुपये किमतीचा १२७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात ( Pimpri Chichwad Crime News 14 May 2025)आला आहे. ही कारवाई सोमवारी (१२ मे) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास माळवाडी येथे करण्यात आली. सोन्या उर्फ राकेश मनोहर दाभाडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस गस्त घालत असताना माळवाडी येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६ हजार ३५० रुपये किमतीचा १२७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.


पूर्ववैमनस्यातून कंपनीत कामगाराचा खून

एका कामगाराने रागाच्या भरात सहकार्‍याच्या डोक्यात लोखंडी कॅन्डल फिल्टरने वार करून त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 13) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथील स्वामी समर्थ पॉलीफिल्म इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीमध्ये घडली.

विवेक प्रदीप सेन (वय 22, सध्या रा. चिंबळी) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी भिवा रामचंद्र सुरते (वय 41, रा. लांडगेनगर, भोसरी) यांनी मंगळवारी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरजकुमार हरिलाल दिवाकर (वय 26, रा. सोनवणे वस्ती, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान आरोपी दिवाकर याने विवेक सेन यांच्यावर कंपनीत झोपलेला असताना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून त्याच्या डोक्यात 9 ते 10 वेळा लोखंडी वस्तूने वार केले. गंभीर दुखापतीमुळे विवेक याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Pune Crime News 14 May 2025 : ‘हाय रिटर्न’चं आमिष दाखवून ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक


गुंतवणुकीच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक ( Pimpri Chichwad Crime News 14 May 2025)

शेअर ट्रेडिंगमध्ये दिडपट परताव्याचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना कृष्णा चौक, नवी सांगवी परिसरात घडली.

जितेंद्र सुखलाल मालखेडे (वय 38, रा. निगडी प्राधिकरण) याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश गोविंद सापरिया (वय 49, रा. नवी सांगवी) यांनी मंगळवारी (दि. 13) याबाबत फिर्याद दाखल केली आहे.ही घटना जून 2022 ते 13 मे 2025 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मालखेडे याने फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांना पाच महिन्यांमध्ये दीडपट व्याजाचे आमिष दाखविले. गुंतवणूक केलेल्या रकमेचे नुकसान झाल्यास आरोपीने बारामती येथील रो हाउस व पिंपरीतील स्थावर मालमत्तेच्या आधारावर विश्वास संपादन करून फिर्यादीकडून चार लाख रुपये आरटीजीएसद्वारे घेतले. मात्र मूळ रक्कम किंवा परतावा न दिल्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

DehuRoad : देहूरोडच्या श्री शिवाजी विद्यालयाचा ८९.१३ टक्के निकाल


पत्नीला नांदवण्याच्या कारणावरून सासूला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 14 May 2025)

पत्नीला नांदवण्यासाठी तगादा लावणार्‍या जावयाने सासूला रस्त्यात अडवून मारहाण केली. ही घटना मोशी येथे मंगळवारी (दि. 13) घडली.

अंकुश देवराम चोतमाल (वय 47, रा. भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्ता लक्ष्मण कदम (वय 34, रा. स्तंभ ता. वेद, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची सासू हे लिव्ह अ‍ॅन्ड रिलेशनशीपमध्ये राहतात. मंगळवारी दुपारी एक वाजता मोशीतील काजळे पेट्रोल पंपाजवळ फिर्यादी आणि त्यांच्यासोबत राहणारी महिला हे दोघेजण बसची वाट पाहात थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने फिर्यादी व आरोपीच्या सासूला आरोपी जावायाने दगडाने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी व आरोपीची सासू हे दोघेजण गंभीर जखमी झाले. एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.


चाकण मध्ये मेडिकल दुकानदाराला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 14 May 2025)

चाकण येथे एका मेडिकल दुकानदाराला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या लोंकांना देखील आरोपींनी धक्काबुक्की केली. ही घटना मंगळवारी (१३ मे) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कल्पतरू मेडिकल येथे घडली.

कैलास सोपान पानमंद (४२, आळंदी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद नाणेकर, पियुष सावंत (नाणेकरवाडी, चाकण) आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पानमंद यांचे चाकण येथे मेडिकल दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी पानमंद आणि त्यांच्या दुकानातील कामगार महिला दुकानात असताना आरोपी दुकानात आले. त्यांनी पानमंद यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना मारहाण करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी पानमंद यांच्या दुकानात काम करणारी महिला आणि दुकानाच्या शेजारील दुकानातील काहीजण आले असता आरोपींनी त्यांना देखील धक्काबुक्की केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


चऱ्होली येथे चार किलो गांजा जप्त ( Pimpri Chichwad Crime News 14 May 2025)

चऱ्होली येथे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला गांजा विक्री प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून ३.९२४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (१३ मे) दुपारी दीड वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रोहन नाना पवार (१९, चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोकणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौक ते चऱ्होली फाटा या रस्त्यावर एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रोहन पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख ९६ हजार २०० रुपये किमतीचा ३.९२४ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत रोहन याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


चाकण-तळेगाव रोडवर गांजा विक्री प्रकरणी कारवाई, एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 14 May 2025)

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण-तळेगाव रोडवर अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ३४५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (१३ मे) दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

गणेश अशोक भांडवलकर (२५, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर देहूफाटा येथे एका पत्र्याच्या टपरीजवळ एकजण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गणेश याला अटक केली. त्याच्याकडून १७ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On