ॲपच्या माध्यमातून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांकडून सुमारे ३४ लाख ७२ हजार दंड वसुल
Team MyPuneCity – सार्वजनिक उद्यानांची उत्तम देखभाल सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दक्ष’ या नाविन्यपूर्ण ॲपची अंमलबजावणी केली आहे. हे वेब व मोबाईल आधारित प्लॅटफॉर्म अधिकाऱ्यांना रोजच्या उद्यान देखभाल कामांची नियुक्ती, देखरेख व पडताळणी करण्यासाठी सक्षम बनवत आहे. या डिजिटल परिवर्तनामुळे सर्व प्रभागांतील उद्यान व्यवस्थापनात पारदर्शकता व कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली (Daksh App) आहे.
‘दक्ष’ ॲपद्वारे ठेकेदारांना प्रमुख कार्यक्षमतेच्या निर्देशांकांवर (केपीआय) आधारित कामे दिली जातात. ही कामे पूर्ण करताना ठेकेदारांनी काम सुरू होण्यापुर्वीची आणि काम पुर्ण झाल्यानंरची छायाचित्रे जिओ टॅगिंगसह ॲपवर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच याच ॲपच्या माध्यमातून पर्यवेक्षक प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामाची पडताळणी करत असून यामुळे अहवालांची अचूकता सुनिश्चित होऊन जुन्या कालबाह्य, कागदोपत्री प्रगती अहवालांवरचे अवलंबित्व कमी झाले आहे.
Student Suicide : दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल
याशिवाय, फिल्ड अधिकाऱ्यांची उपस्थिती देखील ‘दक्ष’ ॲपद्वारे थेट नोंदवली जाते. तसेच ठराविक कामे न करणाऱ्या ठेकेदारांना दंडाची सूचना थेट त्यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठविण्याची स्वयंचलित सुविधा देखील ॲपमध्ये देण्यात आली आहे. उद्यान, नागरी, विद्युत आणि सुरक्षा विभागातील अधिकारी ‘दक्ष’ ॲपचा वापर करून स्थाननिहाय कामे नियुक्त करू शकतात. ठेकेदारांनी काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पुरावे छायाचित्रांच्या स्वरूपात थेट ॲपवर अपलोड करणे आवश्यक असते. प्रणालीमध्ये सुसंगत डॅशबोर्ड असून प्रभाग, विभाग आणि मुख्यालय या सर्व स्तरांवर कामगिरीवर याद्वारे लक्ष ठेवता येत आहे.
त्यामुळे वेळेची बचत होऊन कामाची पुनरावृत्ती टाळणे, ठेकेदारांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे आणि अयोग्यरित्या पूर्ण केलेली कामे पुन्हा दुरूस्तीसाठी पाठविणे सोपे झाले आहे. ॲपद्वारे निकृष्ठ कामगिरी करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. उद्यान विभागाच्या वतीने आतापर्यंत सुमारे ३४ लाख ७२ हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सध्या ३७ ठेकेदार शहरातील उद्यानांच्या देखभालीचे कामकाज पाहत आहेत.
याशिवाय, ॲपद्वारे कामांची प्रत्यक्ष तपासणी उपआयुक्त, उद्यान अधीक्षक यांच्यासह संबंधित वरिष्ठ निरीक्षक अधिकारी करत आहेत. त्याचबरोबर, महानगरपालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त देखील या सर्व कामकाजाचे थेट व रिअल टाइम निरीक्षण करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून नागरी सुविधांच्या देखभालीसाठी एक आधुनिक व परिणामकारक यंत्रणा कार्यान्वित (Daksh App) झाली आहे.
दक्ष ॲपची वैशिष्ट्ये
मोबाईल व वेब इंटरफेस – अधिकारी व ठेकेदार यांच्यासाठी सहज वापरता येण्याजोगे
डिजिटल प्लॅटफॉर्म.
जिओ टॅगिंगवर आधारित काम व देखरेख – काम सुरू करण्यापूर्वी व नंतरचे फोटो आणि
थेट लोकेशन ट्रॅकिंग.
डॅशबोर्ड प्रणाली – ठेकेदार, प्रभाग व मुख्यालयासाठी स्वतंत्र केपीआय ट्रॅकिंग डॅशबोर्ड
प्रणाली.
दंड आकारण्याची सुविधा – ठेकेदारांची कामे अपूर्ण राहिल्यास स्वयंचलित दंड
आकारण्याची सुविधा.
ॲपद्वारे हजेरी नोंदविण्याची सुविधा – फिल्ड अधिकाऱ्यांची दररोज उपस्थिती ॲपद्वारे
नोंदविण्याची सुविधा.
विभागांनुसार विभागणी – उद्यान, नागरी, विद्युत, उपकरणे आणि सुरक्षा संबंधित
कामांसाठी वेगवेगळे विभाग.
सामग्री व यंत्रणा व्यवस्थापन – सर्व उद्यानांची व उद्यानातील मालमत्तांची भौगोलिक नोंद.
अपुर्ण कामे पुन्हा दुरुस्तीसाठी पाठविण्याची सुविधा – अपूर्ण किंवा असमाधानकारक कामे
संबंधित अधिकारी पुन्हा दुरुस्तीसाठी पाठविण्याची सुविधा.
‘दक्ष’ ॲपच्या अंमलबजावणीमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान
व्यवस्थापनामध्ये एक सकारात्मक बदल घडवत आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक
उद्यानाच्या देखभालीसंबंधी कामांची नियोजनबद्ध नोंद, त्याची तांत्रिक पडताळणी आणि
तात्काळ कारवाई याची खात्री करणे सोपे झाले आहे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुशोभित
आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश असून ‘दक्ष’ ॲप हे
त्याकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल (Daksh App) आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
पूर्वी उद्यानांच्या देखभालीबाबत अहवाल देण्याची प्रक्रिया पूर्णतः कागदोपत्री आणि
वेळखाऊ होती. ‘दक्ष’ ॲपच्या माध्यमातून आता ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल स्वरूपात
झाली आहे. आता प्रत्येक काम केपीआय आधारित असल्याने जिओ टँगिंग केलेली छायाचित्रे
आणि वेळेवर अपलोड होणारे अहवाल यामुळे कामाची विश्वासार्हता आणि पारदर्शकता
मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या प्रणालीमुळे ठेकेदारांच्या कामगिरीवर सातत्याने लक्ष
ठेवणे, वेळेवर दंड प्रक्रिया राबवणे, आणि सेवा गुणवत्तेत सातत्य ठेवणे शक्य ( Daksh App
) झाले आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका.