Team MyPuneCity – शेवाळवाडी परिसरात पायी जाणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गाठत तिच्या गळ्यातील ८०,००० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी केली. ही घटना ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ९.३० च्या ( Pune Crime News 13 May 2025) सुमारास घडली.
फिर्यादी महिला (वय ४५, रा. शेवाळवाडी, हडपसर) या समृद्धी बंगला, महादेव मंदिराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून ते घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गैड तपास करीत आहेत.
Shatrughna Kate : प्रस्थापितांना ‘ काटे की टक्कर’ देत शत्रुघ्न काटेंनी मिळवेले शहराध्यक्षपद
जुन्या वादातून इसमाला दगडाने ठेचून हत्या – दोघे आरोपी अटकेत ( Pune Crime News 13 May 2025)
कोंढवा, पुणे – जुन्या पैशाच्या वादातून दोघांनी मिळून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. सुभाष रघुवीर परदेशी (वय ५२, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे मृताचे नाव आहे.
हि घटना १० मेच्या रात्रीपासून ११ मे २०२५ रोजी संध्याकाळपर्यंतच्या काळात पारशी मैदान, ज्योती हॉटेल चौक, कोंढवा येथे घडली. आरोपी अभय जगन्नाथ कदम (वय २४, रा. तालीम चौक, भैरवनाथ आळी, कोंढवा खुर्द) आणि बादल शाम शेरकर (वय २४, रा. बघे चाळ, कोंढवा) या दोघांनी फिर्यादी महिलेच्या पतीस पैशाच्या कारणावरून वाद घालून चेहऱ्यावर व डोक्यावर दगडाने मारहाण करत ठार केले.
कोंढवा पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप हे तपास करत आहेत.
बसमध्ये चढताना निष्काळजी चालकाच्या चुकीमुळे वृद्धाचा मृत्यू ( Pune Crime News 13 May 2025)
हडपसर, पुणे – हडपसर येथील गाडीतळाजवळ पीएमपीएल बसमध्ये चढताना एका वृद्ध व्यक्तीच्या पायावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली.
प्रकाश रामभाऊ गायकवाड (वय ५६, रा. माऊलीनगर, नाळवंडी रोड, बीड) हे बसमध्ये चढत असताना चालकाने निष्काळजीपणे बस पुढे नेल्याने त्यांच्या डाव्या पायावर चाक गेले. या अपघातात त्यांच्या मांडीला गंभीर इजा झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादी बाळासाहेब गायकवाड (वय ३३, रा. नाळवंडी रोड, बीड) यांच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करीत आहेत.
सदाशिव पेठेतील मेडिकल दुकानात मध्यरात्री चोरी, ६४ हजार रुपयांची रोकड लंपास ( Pune Crime News 13 May 2025)
सदाशिव पेठ, पुणे – १३२३, सदाशिव पेठेतील दीपा कॉर्पोरेशनच्या मेडिकल दुकानात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री खिडकी तोडून प्रवेश करत तब्बल ६४,००० रुपये रोख रक्कम चोरी केली. ही घटना १२ मे २०२५ रोजी पहाटे ३.२७ ते ४.३० च्या दरम्यान घडली.
फिर्यादी महिला (वय ४३, रा. बिबवेवाडी) यांच्या मेडिकल दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कोणत्यातरी वस्तूच्या साहाय्याने तोडण्यात आले. त्यानंतर गल्ल्यांचे लॉक तोडून रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार गोंजारी तपास करत आहेत.
पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेला १.५ लाखांचे दागिने आणि मोबाईल गमवावा लागला ( Pune Crime News 13 May 2025)
बंडगार्डन, पुणे –डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून हिंजवडीकडे जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये चढताना एका ४८ वर्षीय महिलेचे १.५ लाख रुपये किमतीचे दागिने व ५,००० रुपयांचा मोबाईल चोरीला गेला. ही घटना १२ मे रोजी दुपारी १२.१० वाजता घडली.
फिर्यादी महिला (रा. येरवडा) या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेला.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करत आहेत.
लक्ष्मीनगरमध्ये पीएमपी बसमध्ये महिला प्रवाशाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरी ( Pune Crime News 13 May 2025)
पर्वती, पुणे –लक्ष्मीनगर येथील गजानन महाराज मठ चौकापर्यंत प्रवास करताना एका ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. या बांगड्यांची किंमत ७०,००० रुपये आहे. ही घटना १२ मे २०२५ रोजी रात्री ७.४५ ते ८.४५ या दरम्यान घडली.
फिर्यादी महिला (वय ६४, रा. कोंढवा) या पंचमी चौक येथून लक्ष्मीनगरपर्यंत पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.
पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक कोपनर करीत आहेत.