situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 12 May 2025:गरवारे कॉलेजजवळील अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू; अज्ञात अल्पवयीन चालक फरार

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –गरवारे कॉलेज समोरील सिग्नलजवळील कर्वेरोड परिसरात एका अज्ञात वाहनाने एका पादचाऱ्यास जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत व्यक्तीचे नाव नंदकिशोर धोंडू महाडिक (वय ६०, रा. कवडे, एरंडवणा गावठाण, डेक्कन जिमखाना, पुणे) असे आहे. फिर्यादी कुणाल मोरे (वय २७, रा. सदाशिव पेठ, पुणे) यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

सदर अपघात अज्ञात अल्पवयीन मुलाच्या ताब्यातील वाहनाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून केला. अपघातानंतर आरोपीने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महाडिक यांचा ११ मे रोजी मृत्यू झाला.

Pune: राजेंद्र पवार कर्तव्यनिष्ठ बहुआयामी व्यक्तीमत्व – डॉ. श्रीपाल सबनीस

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार घोडके करीत आहेत.


पाषाण परिसरात वयोवृद्ध नागरिकाच्या गळ्यातील साखळीची जबरी चोरी

पाषाणमधील पंचवटी भागात सकाळी फेरफटका मारत असलेल्या ७० वर्षीय नागरिकाच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जबरी हिसकावून नेली.

फिर्यादी वयोवृद्ध नागरिक पाषाणमधील पंचवटी परिसरात राहतात. सकाळी ६.२० च्या सुमारास सिमेंट कंपनीजवळ ही घटना घडली. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीला अटक

आंबेगाव पठार येथील एका विवाहितेच्या आत्महत्येस तिच्या पतीने मानसिक व शारीरिक छळ करून प्रवृत्त केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी आशिष आलगट (वय २२, रा. भूम, जि. धाराशिव) यांच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विकास बाळासाहेब कोकणे (वय ३७, रा. अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

माधुरी विकास कोकणे (वय ३४) या पतीच्या दुसऱ्या महिलेबरोबरच्या संबंधामुळे मानसिक तणावात होत्या. पतीने वारंवार शिवीगाळ व मारहाण करत तिला दहा लाख रुपये माहेरून आणण्यास भाग पाडले. त्यामुळे त्रास सहन न होऊन माधुरी यांनी आत्महत्या केली. ही घटना डिसेंबर २०२३ पासून १० मे २०२५ पर्यंतच्या कालावधीत अष्टविनायक नगर व लोणावळा येथील ऑफिसमध्ये घडली.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.


दशभुजा गणपती मंदिराजवळ महिलेला अज्ञात दुचाकीस्वारांकडून जबरी चोरी

पौड फाटा येथील दशभुजा गणपती मंदिराजवळ एका ४३ वर्षीय महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार घडला.

ही घटना ११ मे रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला त्या ठिकाणी थांबलेली असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी जवळ येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले.

अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


चांदणी चौकाजवळ वृद्ध महिलेला लक्ष्य करून मंगळसूत्राची चोरी

कोथरूडमधील चांदणी चौक परिसरात ६९ वर्षीय महिलेला दुचाकीस्वार चोरट्यांनी गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

या घटनेची माहिती अशी, की फिर्यादी महिला सकाळी ६.२५ वाजता बौकातून पौड फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर लोहे जैन IT पार्कच्या समोर उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले.

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सानप करत आहेत.


पोकलैंड मशीनच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालक अटक

हडपसरच्या रामटेकडी परिसरात कचरा गोळा करत असलेल्या एका महिलेचा पोकलैंड मशीनच्या धडकेत मृत्यू झाला. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेखा सुभाष काळे (वय ३०, रा. रेल्वे ट्रॅकजवळ, रामटेकडी, हडपसर) या महिला कचरा गोळा करत असताना ११ मे रोजी दुपारी १२ वाजता पोकलैंड मशीनच्या बकेटने त्यांच्या पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्या.

फिर्यादी सुभाष काळे (वय ३८, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी अरविंद प्रभु पासवान (वय ३०, रा. रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव करत आहेत.

Follow Us On