Team MyPuneCity –जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना रविवारी (11 मे) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वडमुख वाडी येथे घडली.
सोहम सचिन शिंदे (17, माऊली नगर कॉलनी क्रमांक एक, दिघी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. नामदेव उर्फ निलेश शिंदे, शुभम पोखरकर, सुमित शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन
Vinod Sutar : पिंपरी-चिंचवडमधील तबलावादक व संगीत शिक्षक विनोद सुतार यांचा अपघाती मृत्यू
पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सोहम शिंदे हा त्याच्या मित्रांसोबत वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळ गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सोहम याला शिवीगाळ केली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आरोपींनी कोयत्याने सोहमच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोहमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता विरोधी पथकाने अवघ्या काही तासात तीनही आरोपींना अटक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.